घनकचराविभागाच्या बैठकीत उपायुक्त श्री. यशवंत डांगे यांचे आदेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

घनकचराविभागाच्या बैठकीत उपायुक्त श्री. यशवंत डांगे यांचे आदेश

 घनकचराविभागाच्या बैठकीत उपायुक्त श्री. यशवंत डांगे यांचे आदेश

घंटागाडीवरील गाणे चालूच ठेवा
घनकचरा विभागाच्या प्रत्येक प्रभागात गाडी रोज गेलीच पाहिजे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः कुठेही रस्त्यावर कचर्‍याचे ढिग दिसणार नाही याची काळजी घ्या. मी सकाळी 7 वाजल्यापासून शहरात फिरत असतो. मला सर्व माहिती झाली आहे. गाडयांना जीपीएस बसविले आहेत का याची माहिती घ्या. त्याच बरोबर घंटागाडीवरील गाणे चालू ठेवा. नागरिकांसाठी हेल्पलाईन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तीच गाडी, ड्रायव्हर, हेल्पर  त्याच प्रभागामध्ये दररोज गेली पाहिजे. गाडयांबरोबर मनपाचे कर्मचारी पाठविण्याची व्यवस्था करावी. ओला व सुका कचरा वेगळा करणे गरजेचे आहे. यासाठी ठेकेदार यांनी घंडागाडीला दोन कप्पे करण्यात यावे व नागरिकांना याची माहिती दयावी. नागरिकांमध्ये मनपा बद्दलची भावना सकारात्मक होईल यादृष्टिने काम करा. असे आवाहन घनकचरा विभागाच्या बैठकीत उपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.
   श्री डांगे या बैठकीत पुढे म्हणाले की, एक लाख वीस हजार घरापर्यत घंटागाडी जावून 100 टक्के कच-याचे संकलन होणे गरजेचे आहे. त्याच बरोबर 100 टक्के सुका व ओला कचरा विलगीकरण करून  त्यावर 100 टक्के प्रक्रिया झाली पाहिजे. तेव्हाच  खर्‍या अर्थाने आपले शहर स्वच्छ व सुंदर राहिल यासाठी सर्व घनकचरा व आरोग्य विभागाने कामाचे नियोजन करावे. शहरातील 3 रॅम्प वरून घंटागाडीतील कचरा कॉम्पॅक्टर द्वारे कचरा डेपोवर वेळेचे नियोजन करून पाठविण्यात यावे. आपण ठेकेदारा मार्फत उचलल्या जाणा-या कच-यासाठी कोटयावधी रूपये देतो. त्याच्याकडून काम करून घेणे गरजेचे आहे. यासाठी नियोजन करा. आपण भारत स्वच्छ अभियाना करिता काम न करता वर्षभर काम करावे असेही डांगे म्हणाले.
   स्वच्छता अपवर तक्रार आल्यानंतर ताबडतोब ती सोडविण्यासाठी कर्मचारी यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष जावून तक्रारीचे निराकरण करावे. शहरातील 17 प्रभागामधील 1 रस्ता निवडा व त्याचे सुशोभिकरण करावे यावर पेंटीग झाडे स्वच्छता ठेवावी. जेणे करून टप्प्या टप्प्याने संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर दिसेल. 60 घंटागाडया 15 टॅकर व 3 कॅम्पॅक्टर द्वारे पूर्ण क्षमतेने कचरा उचलला गेला पाहिजे. दर सोमवारी दुपारी 4 वा. बैठक घेतली जाईल. त्यामध्ये शहरातील कच-या संदर्भात आढावा घेवून नियोजन करण्यात येईल अशी माहिती ही प्रसंगी उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांनी दिली. यावेळी स्वच्छता निरिक्षक, केअरटेकर, मुकादम व कचरा संकलन एजन्सीचे कर्मचारी उपस्थित होते. सर्वांकडून माहिती घेवून सुचना देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment