विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघात 100 टक्के मतदान.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघात 100 टक्के मतदान..

 विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघात 100 टक्के मतदान..

बिगरशेती संस्था मतदारसंघात दुपारपर्यत 87 टक्के मतदान..

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः अहमदनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज 4 जागेसाठी झालेल्या मतदानात सोसायटी मतदार संघात तीन जागांसाठी मतदान झाले असून बिगर शेती संस्था मतदार संघासाठी कमी मतदान झाले आहे. नगर तालुका सेवा संस्था गटातील 109 मतदारांपैकी 109 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
   अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या चार जागांसाठी आज शनिवारी (20 फेब्रुवारी) जिल्ह्यातील 14 मतदान केंद्रांवर मतदान झाले असून, रविवारी (21 फेब्रुवारी) मतमोजणी होणार आहे. या चार जागांच्या निकालाकडे जिल्ह्याचे व बँकेच्या राजकीय विश्वाचे लक्ष लागले आहे.
   बँकेच्या बिनविरोध झालेल्या 17 जागांपैकी राहात्याची अवघी एक जागा विखे गटाची मानली जाते. बाकी 16 जागांपैकी बहुतांश जागा महाविकास आघाडी तसेच भाजपमधील सहमतीच्या मानल्या जातात. या पार्श्वभूमीवर आता राहिलेल्या चार जागांच्या होत असलेल्या निवडणुकीत विखेंची भूमिका महत्त्वाची मानले जाते. या जागांपैकी पारनेरला त्यांनी भोसलेंना तर बिगरशेतीमध्ये त्यांनी पानसरेंना ताकद दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दोन जागांचे निकाल काय लागतात तसेच नगर तालुका व कर्जत मतदार संघाबाबत विखेंची भूमिका काय असेल, याचीही उत्सुकता व्यक्त होत आहे.
   नगर तालुका, कर्जत तालुका व पारनेर तालुका विविध कार्यकारी सेवा संस्था अशा तीन मतदार संघांसह बिगर शेती संस्था मतदार संघ अशा चार जागांसाठी आज मतदान झाले. नगर तालुका विविध कार्यकारी सेवा संस्था गटात 109 मतदार असून, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व सत्यभामाबाई बेरड यांच्यात लढत होत आहे. दुपारपर्यंत 109 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. कर्जत विविध कार्यकारी संस्था मतदार संघात अवघे 74 मतदार असून, तेथे अंबादास पिसाळ व मीनाक्षी साळुंके यांच्यात लढत होत आहे.तेथे 73 जणांनी मतदान केले. एक मतदारावर गुन्हा दाखल असल्यामुळे तो येवू शकला  नाही तर पारनेर विविध कार्यकारी सेवा संस्था गटात 105 मतदार असून, येथे माजी संचालक उदय शेळके व रामदास भोसले यांच्यात लढत होत आहे. तसेच बिगरशेती संस्था मतदारदार संघात 1320 मतदार असून, या मतदार संघात 87 टक्के मतदान झाले आहे येथे माजी संचालक दत्ता पानसरे व प्रशांत गायकवाड यांच्यात लढत होत आहे.     अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिगरशेती मतदारसंघासाठी श्रीगोंदा तालुक्यातील 69 मतदारांपैकी 66 जणांनी दुपारी 3 वाजेपर्यंत शांततेत मतदानाचा हक्क बजावला होता. तर 3 मतदार कोरोना संक्रमणाने आजारी असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.सदा अण्णा पाचपुते यांचे काल निधन झाले असताना ही त्यांच्या भाउजयी डॉ. प्रतिभा पाचपुते यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राच्या परिसरात पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलिप तेजनकर यांच्या उपस्थितीत चोख बंदोबस्त तैनात करण्यात केलं होता. तसेच मतदान केंद्राच्या बाहेर माजी आमदार राहुल जगताप, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, राज्य साखर संचालक घनश्याम शेलार, काष्टी सोसायटीचे चेअरमन भगवान पाचपुते, बाजार समितीचे माजी सभापती वैभव पाचपुते, बाळासाहेब नाहटा, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाधक्ष दत्तात्रय हिरवे, पंचायत समिती माजी सभापती अर्चनाताई पानसरे, नगरसेवक बापूशेठ गोरे, माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके आदींसह प्रमूख पदाधिकारी कार्यकर्ते मतदान केंद्रा बाहेर ठान मांडून बसलेले होते. या जागांपैकी कर्डिले, साळुंके, शेळके व गायकवाड यांनी पॅनेल करून कप-बशी हे समान निवडणूक चिन्ह घेतले आहे तर त्या प्रतिस्पर्ध्यांपैकी पिसाळ, भोसले व पानसरे यांनी विमान व बेरड यांनी छत्री चिन्ह घेतले आहे. चारही मतदार संघ मिळून एकूण मतदार 1604 असून, ते मतदानातून काय किमया करतात, हे रविवारी मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment