शुभयान ऑटोमध्ये सीएनजी बीएस-6 वाहनांचे वितरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

शुभयान ऑटोमध्ये सीएनजी बीएस-6 वाहनांचे वितरण

 शुभयान ऑटोमध्ये सीएनजी बीएस-6 वाहनांचे वितरण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः एम.आय.डी.सी. येथील शुभयान ऑटो प्रा.लि ही टाटा मोटर्सच्या मालवाहू वाहनांची अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यांची अधिकृत डीलरशीप आहे. 1 एप्रिल 2020 पासून देशभरात बीएस-6 (भारत स्टेज-6) प्रदूषण मानकांची पूर्ती करणारी वाहनेच विक्री केली जात आहेत. याअंतर्गत नगर जिल्ह्यातील पहिल्या पाच टाटा एलपीटी 1109 सीएनजी वाहनांचा वितरण सोहळा नुकताच पार पडला. उद्योजक आणि वाहतूक व्यवसायिक मे.अनमोल ट्रान्सपोर्ट कंपनी यांनी हि वाहने खरेदी केलेलीअसून  शुभयान ऑटोचे संचालक विकी मुथा यांचे शुभहस्ते अनमोल ट्रान्सपोर्टचे सरबजीत सिंग यांना वाहनांचा ताबा देण्यात आला. याप्रसंगी शुभयान ऑटोचे संचालक निलेश चोपड़ा, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक बोठे, सुंदरम फायनान्सचे व्यवस्थापक संदीप देशमुख, टाटा मोटर्स फायनान्सचे चेतन काटे, एचडीएफसी बँकेचे चेतन म्हस्के , एचडीबी फायनान्सचे विकास खाडे , चोलामंडलम फायनान्सचे गणेश शेलार , एयू बँकेचे शाखाधिकारी अशोक मोरे उपस्थित होते.
   बीएस-6 वाहनांच्या वापराने प्रदूषणात मोठी घट होणार आहे. टाटा मोटर्सने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बीएस-6 वाहनांची निर्मिती सुरु केलेली आहे. फक्त प्रदूषण मानक अत्याधुनिक नाहीत तर अनेक अत्याधुनिक सुविधा आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण वाहनांची टाटा मोटर्सने निर्मिती केलेली आहे. त्याचाच भाग म्हणून पर्यावरण पूरक इंधनाचा वापर करणारी वाहने टाटा मोटर्स उत्पादित करत आहे. त्यामध्ये सीएनजी इंधनावर चालणार्‍या वाहनांचा समावेश आहे.
   टाटा च्या बीएस-6 सीएनजी वाहनांची अनेक नवीन वैशिष्ट्य आहेत. व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम, गिअर शिफ्ट ऍडव्हायझर, इकॉनॉमी-पॉवर मोड, रिव्हर्स पार्किंग असिस्टंट, मायलेज कॅल्क्युलेटर, इत्यादी वैशिष्ट्य आहेत. डीझेल वाहनांच्या तुलनेत सीएनजी वाहनांचे मायलेज सारखेच असून प्रती  लिटर डीझेलची किंमत आणि सीएनजीची किंमत विचारात घेता वाहन चालवण्याचा खर्च तब्बल 33 टक्के (4 रुपये प्रति  किलो मीटर) कमी होईल. वाढत्या इंधनाच्या किमतीचा विचार करता सीएनजी वाहन नक्कीच फायदेशीर ठरेल. सीएनजी वाहने लहान, मध्यम मालवाहू वाहनांच्या श्रेणीमध्ये त्याचप्रमाणे प्रवासी बस मध्ये उपलब्ध आहेत. ज्यामध्ये वातानुकूलित वाहने सुद्धा आहेत, अशी माहिती अशोक बोठे  यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभयान ऑटोच्या नितीन साळवे (9881734760), उबेद पटेल (9881734770) नितीन गुंडू (9881734749) आणि सेल्स टीमने विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment