न्यू आर्टस् कॉमर्स महाविद्यालयाची प्रगती अभिमानास्पद- अ‍ॅड. भुषण बर्‍हाटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 27, 2021

न्यू आर्टस् कॉमर्स महाविद्यालयाची प्रगती अभिमानास्पद- अ‍ॅड. भुषण बर्‍हाटे

 न्यू आर्टस् कॉमर्स महाविद्यालयाची प्रगती अभिमानास्पद- अ‍ॅड. भुषण बर्‍हाटे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना घडवत उच्च पदस्थ केले आहे. आज देशातील कानाकोपर्यांमध्ये विद्यार्थी विविध क्षेत्रात योगदान देत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्या या  मोठ्या महाविद्यालयाला आता स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळविल्याने महाविद्यालयाने केलेली प्रगती अभिमानास्पद आहे. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून याबद्दल मला आनंद होत आहे, असे प्रतिपादन वकिल संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.भुषण बर्‍हाटे यांनी केले.
   शहर वकिल संघटनेच्यावतीने न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे यांचा अध्यक्ष अ‍ॅड. भुषण बर्‍हाटे यांनी सत्कार केला. तसेच भ्रमणध्वनीवरुन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे व सचिव अ‍ॅड. विश्वासराव आठरे यांच्याशी संपर्क साधून त्यांचेही अभिनंदन केले. यावेळी वकिल संघटनेचे माजी अध्यक्ष  अ‍ॅड. लक्ष्मण कचरे , केंद्र सरकारचे वकिल सुभाष भोर, अ‍ॅड. सुनिल तोडकर आदि उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. सुभाष भोर म्हणाले, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शतकोत्तर वर्षात अजून एक मानाचा तुरा संस्थेच्या मस्तकी विराजमान झाला आहे. महाविद्यालयाला मिळालेल्या स्वयत्त दर्जामुळे महाविद्यालयाची मोठी प्रगती भविष्यात होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here