अहमदनगर जिल्हा कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्यावतीने नूतन सरपंच व सदस्यांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

अहमदनगर जिल्हा कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्यावतीने नूतन सरपंच व सदस्यांचा सत्कार

 अहमदनगर जिल्हा कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्यावतीने नूतन सरपंच व सदस्यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः कुस्ती क्षेत्रात योगदान देणारे पै. नाना डोंगरे निमगाव वाघा ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल तर पै. बंटी गुंजाळ यांची दैठणेगुंजाळ सरपंचपदी निवड झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नालेगाव, नेप्ती नाका चौकात झालेल्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी महासंघाचे शहराध्यक्ष पै.बंडू शेळके, पै.काका शेळके, जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद जपे, अशोक घोडके, कामगार केसरी पै. सुनिल कदम, ह.भ.प. जयसिंग महाराज मडके, नगर तालुका तालिम संघाचे सचिव बाळू भापकर, आदम शेख, दादा पांडूळे आदी उपस्थित होते.
   मिलिंद जपे म्हणाले की, लाल मातीत तयार झालेले मल्ल राजकीय क्षेत्रात योगदान देऊन सामाजिक योगदान देत आहे. नाना डोंगरे व बंटी गुंजाळ यांचे सामाजिक व कुस्ती क्षेत्रात मोठे योगदान असून, गावाच्या विकासासाठी ते विश्वासास पात्र ठरणार आहे. ग्रामस्थांनी सर्वसामान्य व्यक्तीला निवडून काम करण्याची संधी दिली असून, हा जनशक्तीचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना पै. डोंगरे व पै. गुंजाळ यांनी गावाचा विकास हेच ध्येय समोर ठेऊन कार्य केले जाणार आहे. गावाच्या मातीशी प्रामाणिक राहून विकासात्मक कार्याने सामाजिक बांधिलकी जपली जाणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment