कृष्णा रामदासी या बाल रामभक्ताने बनायेंगे मंदिर गीत गाऊन लक्ष वेधले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

कृष्णा रामदासी या बाल रामभक्ताने बनायेंगे मंदिर गीत गाऊन लक्ष वेधले

 कृष्णा रामदासी या बाल रामभक्ताने बनायेंगे मंदिर गीत गाऊन लक्ष वेधले


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः नगर शहरात अयोध्दा येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण कार्यात बाल रामभक्तांनी सहभागी होऊन श्रीराम सेवेचा आनंद लुटला.निधी संकलन अभियानात नऊ वर्षीय कृष्णा रामदासी या छोट्या रामभक्तानी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. घरोघरी जाऊन श्रीराम मंदिराचे बनायेंगे मंदिर हे गीत गाऊन सर्वांचे मन जिंकले.बाल हनुमानाप्रमाणे श्रीराम भक्तीचे दर्शन घडविले.जय श्रीराम या नावाचा जयघोष करुन निधी संकलन केले.याप्रसंगी श्रीमती नलिनी सुरेश बल्लाळ या आजींनी निधीचा धनादेश बाल रामभक्त कृष्णा रामदासी यांच्याकडे सुपूर्त केला.याप्रसंगी किरण बल्लाळ,ईशान बल्लाळ,अश्विनी बल्लाळ आदी कुटुंबाचे सदस्य,अभियानाचे जिल्हा सह संयोजक अनिल रामदासी, वैष्णव मोरे,मते सर,श्रीपाद रामदासी,श्री चारगुंडी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment