एकदंत गणेश मंदिराच्या धार्मिक, सामाजिक, कार्यक्रमांचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

एकदंत गणेश मंदिराच्या धार्मिक, सामाजिक, कार्यक्रमांचा शुभारंभ

 एकदंत गणेश मंदिराच्या धार्मिक, सामाजिक, कार्यक्रमांचा शुभारंभ

कार्यक्रमांचे नियोजन म्हणजे खरी गणेश जयंती साजरी होते - श्रीकांत बेडेकर

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः गणेश जयंती निमित्त एकदंत गणेश मंडळाच्यावतीने विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करुन त्या माध्यमातून गरजू लोकांच्या गरजा पुर्ण होण्यास मदत होत आहे. विविध आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरे, सामुदायिक विवाह सोहळा, रक्तदान शिबीर असे कार्यक्रमांमुळे आज एकदंत गणेश मंडळाचा या नगर शहरात 17 वर्षापासून चांगले नाव आहे. गणेश जयंती निमित्त एकदंत गणेश मंदिराच्या विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ करताना बेडेकर क्लासचे संस्थापक श्रीकांत बेडेकर,राम एजन्सीचे मालक मोनिष मेघानी, महावीर वूलन हाऊस चे मालक ओमप्रकाश बायड, सौ.पुष्पा बायड, राष्ट्रीय खेळाडू पै.शुभम दातरंगे आदी उपस्थित होते.
    यावेळी बोलताना मोनिष मेघानी म्हणाले कि, एकदंत गणेश मंडळाच्या वतीने गणेश जयंती उत्सव म्हणजे आता या नगर शहराची एक ओळख बनली आहे. या उत्सवाच्या माध्यमातुन गरजू लोकांना मोठा लाभ होत आहे. धार्मिक उत्सव म्हंटल कि धार्मिक विधी, विविध पुजा-आर्चा, भजन, किर्तन या पलीकडे जाऊन मंडळाने या कार्यक्रमांना आरोग्य शिबीरांची जोड देऊ केल्यामुळे आज अनेकांना याचा लाभ होत आहे. प्रास्तविकात सौ. सुरेखा कोडम म्हणाल्या कि, आजच्या महागाईच्या काळात लग्न करणे म्हणजे खुप कठीण आहे. त्यामुळे मंडळाच्यावतीने गेल्या 12 वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी एक विवाह आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश गुडा यांनी केले. तर आभार सौ.विनोदा बेत्ती यांनी मानले. यावेळी नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment