भालसिंग खून प्रकरण तपासात हलगर्जीपणा भोवला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

भालसिंग खून प्रकरण तपासात हलगर्जीपणा भोवला

 भालसिंग खून प्रकरण तपासात हलगर्जीपणा भोवला

पारनेर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सिंग राजपूत निलंबित

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः वाळकी येथील भालसिंग खून प्रकरणाच्या हलगर्जी केल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सिंग राजपूत यांना निलंबित करण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काल काढला आहे.
   काही दिवसांपूर्वी सहाय्यक निरीक्षक रजपूत यांची बदली नगर तालुका पोलिस ठाण्यातून पारनेर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. रजपूत यांची पारनेरला बदली झाल्यानंतर ते 15 दिवसांच्या रजेवर होते. रजा संपल्यानंतर त्यांनी दोनच दिवस पारनेर पोलिस स्टेशनला कर्तव्य बजावले. मात्र दोन दिवसांनंतर रजपूत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
   सहाय्यक पोलिस निरीक्षक रजपूत हे याआधी नगर तालुका पोलिस स्टेशनला कार्यरत होते. त्यावेळी वाळकी येथील ओंकार भालसिंग या तरूणाचा खून झाला होता. भालसिंग खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विश्वजित कासारसह काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. भालसिंग खून प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा केल्याने रजपूत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment