कोरोना वाढतोय! शहरं अलर्ट वर? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

कोरोना वाढतोय! शहरं अलर्ट वर?

 कोरोना वाढतोय! शहरं अलर्ट वर?

नगर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण...
सावधान
मुंबई : तीन ते चार महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोकंवर काढलं आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली असून त्यामुळे ही शहरं अ‍ॅलर्ट झाली आहेत. कोणती आहेत ही शहरं? काय आहे या शहरांची परिस्थिती? त्याबाबतचा घेतलेला हा आढावा. राज्यात काल मंगळावारी 3663 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर नवीन 2700 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 19, 81, 408 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 37125 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.66% झाले आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील दहा जणांना कोरोना झाल्याच समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील दहा जणांना कोरोनाची लागण झालीय. कुटूंबातील एक तरुण पुणे येथे काही दिवस गेला. पुण्याहून घरी आल्यावर त्यास ताप आल्यानंतर तपासणी केली असता कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर कुटूंबातील इतरांची तपासणी केल्यानंतर तरुणासह एकुण 10 जणांनाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले. उंदिरगावमधील एका कुटुंबातील 10 जणांना कोरोना झाल्याचं समोर आल्यानंतर शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा वाढत चालला असल्याच दिसूय येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यानी कोरोना नियंत्रणासाठी जारी केलेल्या नियमावलीची कठोर अंमलबजावणी करणार असल्याचं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी म्हटलं आहे.मुंबईत कोरोना रुग्ण सर्वाधिक -  मुंबईत काल दिवसभरात 461 रुग्ण सापडले आहेत. तर तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 4238 रुग्ण सक्रिय आहेत. मुंबईतील के ईस्ट (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड (मुलुंड), आर सेंट्रल (बोरिवली), एम वेस्ट (चेंबूर, टिळक नगर) या भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. हे चारही वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट ठरताना दिसत आहेत. मुंबईत दररोज कोरोना रुग्णांची संख्या 10 ते 15 टक्क्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकल प्रवासात अनेक प्रवाशांकडून मास्क वापरला जात नसल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी पालिकेने कठोर पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. त्यासाठी लोकलमध्ये मार्शल नियुक्त केले जाणार आहेत. आतापर्यंत 15 लाख मुंबईकरांवर मास्क न वापरल्याबद्दल कारवाई झाली आहे. त्यांच्याकडून 30 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
   ठाण्यात पाच हजार रुग्ण सक्रिय - ठाणे जिल्ह्यात सध्या पाच हजार रुग्ण सक्रिय आहेत. काल मंगलवारी ठाण्यात 56 आणि ठाणे मनपा हद्दीत 88 रुग्ण सापडले आहेत. तर ठाणे जिल्ह्यात काल पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथमध्ये 8, कल्याण 77, भिवंडी 26, शहापूर 36, मुरबाडमध्ये 4 रुग्ण उपचार घेत आहेत. ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 2 लाख 57 हजार 112 असली तरी यापैकी ग्रामीणमधील रुग्णांची संख्या 19 हजार 312 इतकी आहे. यापैकी भिवंडी ग्रामीणमध्ये सर्वाधिक 7 हजार 177 रुग्ण आढळून आले आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये आतापर्यंत 5 हजार 700, शहापूर 3 हजार 424 आणि अंबरनाथमध्ये 1 हजार 850 रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. ग्रामीणमधील एकूण रूग्णांपैकी बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 96.16 टक्के इतके आहे. तर, 590 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू दर 3 टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.
   नागपूरमध्ये डॉक्टरांनाच कोरोना - नागपूर मेडिकल कॉलेजमधील कोरोना बाधितांचा आकडा 38 झाला आहे. त्यात डेंटल महाविद्यालयातील 9, एमबीबीएसच्या 12, पीजी करणार्‍या 9 आणि तीन स्टाफ नर्सचा समावेश आहे. त्यापैकी चार जणांना गृह विलगिकरनात ठेवण्यात आलं आहे. तर बाकी सगळ्यांवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. यातील अनेकजण हे लक्षण नसलेले आहेत. मात्र त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सुद्धा भरती करून घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी कॉलेज सुरू झालं. त्यात वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी आले होते. त्यामुळे या ठिकाणी येऊन त्यांना संक्रमण झालं. आता खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्टेल सॅनिटाइझ करण्यात आलं आहे, अशी माहिती मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता अविनाश गावंडे यांनी दिली. नागपूरमध्ये 12 फेब्रुवारी रोजी 319, 13 फेब्रुवारीला 486, 14 फेब्रुवारीमध्ये 455, 15 फेब्रुवारी रोजी 498 आणि 16 फेब्रुवारीला 535 सापडले. नागपूरमध्ये गेल्या पाच दिवसात कोरोनामुळे एकूण 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर नागपूरमध्ये काल 96, नागपूर मनपा क्षेत्रात 502 आणि वर्ध्यात 62 रुग्ण सापडले आहेत. तर नागपूर परिमंडळात काल दिवसभरात 699 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागपूरकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नागपूरमध्ये आज किंवा उद्या पर्यंत पालिका प्रशासनाकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यात सहा दिवसात 25 जणांचा मृत्यू - पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या सहा दिवसात पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे 800 रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. 10 फेब्रुवारी शहरात 137 रुग्ण आढळले. 11 फेब्रुवारीला 133, 12 फेब्रुवारी रोजी 117, 13 फेब्रुवारीला 120, 14 फेब्रुवारीला 150, 15 फेब्रुवारी रोजी 100 आणि 16 फेब्रुवारी रोजी 142 रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यात 11 फेब्रुवारी रोजी 256, 12 फेब्रुवारीला 258, 13 फेब्रुवारी रोजी 331, 14 फेब्रुवारीला 354, 15 फेब्रुवारी रोजी 193 आणि 16 फेब्रुवारीला 311 रुग्ण आढळले आहेत. या सहा दिवसात पुण्यात सर्वाधिक म्हणजे 25 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
   नाशिकमध्ये निर्बंध लागू - नाशिकमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. नाशिकमध्ये काल 37 आणि नाशिकच्या मनपा हद्दीत 185 कोरोना रुग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये काल कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत नाशिकमध्ये कोरोना संसर्गाचा मोठा उद्रेक झाला होता. त्यामुळे पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून नाशिकमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिवसाला दोनशे रुग्ण सापडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबादमध्येही कहर - औरंगाबादमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा कहर वाढताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये 14 आणि औरंगाबाद मनपा क्षेत्रात 73 कोरोना रुग्ण आढळले आहेत. सुदैवाची गोष्ट म्हणजे काल दिवसभरात औरंगाबादमध्ये कोरोनाने एकाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र, मराठवाड्यातील लातूर, बीड आणि परभणी आदी जिल्ह्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अत्यंत कमी आहे. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वाढली आहे. विभागीय माहिती आयुक्त सुनील केंद्रे यांनी या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बुलडाण्यात जमावबंदी - बुलडाण्यात काल दिवसभरात 89 रुग्ण आढळ्याने बुलडाण्यात जमावबंदी लागू करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. जिल्ह्यात दररोज शंभरच्या सरासरीने रुग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना ठरलेल्या वेळेतच बाहेर पडता येणार आहे. शिवाय दोन पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. तसेच कोरोना नियमांचे काटेकोरपालन करावे लागणार आहे.
विदर्भातल अमरावती, यवतमाळ, अकोल्याला कोरोनाचा विळखा- विदर्भात अकोल्यात 74, अमरावतीत 82, अमरावती मनपा क्षेत्रात 310, यवतमाळमध्ये 71 कोरोना रुग्ण आढळले आहेत. अकोला परिमंडळातच एकूण 662 रुग्ण आढळले आहेत. या तिन्ही जिल्ह्याती मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन अ‍ॅलर्ट झालं आहे. या तिन्ही जिल्ह्यात कोणत्याही क्षणी लॉकडाऊनचे निर्बंध लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment