इंडियन मेडिकल असोसिएशनचे साखळी उपोषण सुरू.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

इंडियन मेडिकल असोसिएशनचे साखळी उपोषण सुरू..

 इंडियन मेडिकल असोसिएशनचे साखळी उपोषण सुरू..

केंद्राने आरोग्य व्यवस्थेची खिचडी थांबवावी- डॉ. पाटे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः केंद्र सरकारने आरोग्य सेवेचे खिचडीकरण थांबवावे, आणि जनतेचे आरोग्य सुरक्षित रहावे, यासाठी आयएमए ने मिक्सोपॅथिच्या विरोधात आज दि. 9 पासून 14 फेब्रुवारीपर्यंत साखळी उपोषण सुरु केले असून, नगरच्या नेप्ती रस्त्यावरील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यालयामध्ये नगरमधील डॉक्टर्सने आजपासून साखळी उपोषण सुरु केले. याप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय सेक्रेटरी डॉ.मंगेश पाटे हे उपस्थित होते.
     याप्रसंगी डॉ.मंगेश पाटे म्हणाले, जगभरात अनेक ठिकाणी भारतीय डॉक्टर्स त्यांच्या निष्णांत सेवेमुळे नावाजले गेले आहेत. कुठल्याही देशातील जनतेचे आरोग्य हे तेथील चांगल्या आरोग्य सेवेवर अवलंबून असते. आज आपल्या देशामध्ये असलेल्या उपचार पद्धती उदा.आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, आधुनिक वैद्यक शास्त्र, अ‍ॅलोपॅथि, असे असून, तरी देखील देशातील 96 टक्के जनतेचा आधुनिक वैद्यक शास्त्रातील उपचार घेण्याकडे कल आहे. याचे कारण म्हणजे सततचे संशोधन व अद्यावत तंत्रज्ञान यामुळे हे शक्य झाले आहे. इतरही लोकांनी (आयुर्वेद, होमिओपॅथी इ.) अशाप्रकारचे संशोधन करावे. ज्ञानाचे अद्यायावतीकरण करुन त्यांची ज्ञानशाखा जागृत ठेवावी, अशी आमची अपेक्षा असून, नूतन शैक्षणिक धोरण आणि सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन्स् या संस्थेने 20/11/2020
     रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार या सर्व उपचार पद्धती एकत्रित करुन आरोग्य सेवेची खिचडी करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे. त्यास इंडियन मेडिकल असोसिएशनचा ठाम विरोध आहे, असे सांगितले. डॉ.अनिल आठरे म्हणाले, मुलभूत सैद्धांतिक मांडणीमध्ये फरक असलेल्या उपचार पद्धती एकत्रिकरण करण्याचा आमचा विरोध आहे. कारण यामुळे आरोग्य सेवेतील गुणवत्ता व सुरक्षिततेबाबत मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे सरकारने सदर प्रस्ताव मागे घेऊन जनतेच्या आरोग्यला धोकादायक परिस्थिती उपचार पद्धतीने अस्तित्वात येऊ नये, अशी आमची मागणी आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी अगोदर बंद पाळण्यात आला. त्यानंतर सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्याने आम्ही हे साखळी उपोषण करत आहोत. संपूर्ण देशभर क्रमाक्रमाने स्थानिक पातळीवर 1800 शाखांचे प्रतिनिधी अशा पद्धतीने साखळी उपोषण करणार आहेत. हा मार्ग अवलंबून यातून जनजागृती करणे हा आमचा उद्देश असून, शासनाने यावर तातडीने सर्वांगिण विचार करुन जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हितकारी निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी 14 फेब्रुवारी 2021 रोजी राजधानी चलो, असा नारा देऊन आमचे प्रतिनिधी मुंंबईत एकत्र येऊन आंदोलन करतील. व इंडियन मेडिकल असो.च्या केंद्रीय पदाधिकार्यांच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असे सांगितले.
         या आंदोलनात इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी नगर शाखाध्यक्ष डॉ.अनिल आठरे, सेक्रेटरी डॉ.सचिन वहाडणे, सीडब्ल्यूसी मेंबर डॉ.निसार शेख, व्हाईस प्रेसिडेंट डॉ.नरेंद्र वानखेडे, डॉ.सागर झावरे, डॉ.सतीष सोनवणे, खजिनदार डॉ.गणेश बडे, जॉ.सेक्रेटरी डॉ.अशोक नरवडे, डॉ.रामदास बांगर, डॉ.अमित कराडे, तसेच डॉ.राहुल पंडित, डॉ.पंकज मते, डॉ.कल्याणी चौधरी, डॉ.आसाराम भालसिंग, डॉ.मुग्धा तन्वर, डॉ.प्रज्ञा जोशी, डॉ.गणेश झरकर, डॉ.सचिन लवांडे, डॉ.गजानन काशिद, डॉ.सुशिल नेमाणे, डॉ.अशोक शिंदे, डॉ.सचिन उद्मले, डॉ.सचिन पांडूळे, डॉ.बापूसाहेब कांडेकर, डॉ.सुनिता अकोलकर, डॉ.सोनाली वहाडणे, डॉ.प्रकाश व डॉ.सुधाताई कांकरिया, डॉ.स्मिता पाठक आदिंसह डॉक्टर्स उपोषणात सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment