मोदी सरकारं गिफ्ट... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

मोदी सरकारं गिफ्ट...

 मोदी सरकारं गिफ्ट

1 एप्रिल पासून...
आठवडा 4 च दिवसाचा? 3 दिवस सुट्टीची शक्यता..

नवी दिल्ली : मोदी सरकारने कर्मचार्‍यांसाठी मोठं गिफ्ट दिलंय. यानुसार 1 एप्रिलपासून तुमचा आठवडा केवळ 4 दिवसांचा होऊ शकतो. नव्या कामगार कायद्यानुसार कर्मचार्‍यांना आठवड्यातून 3 दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. मात्र हा नियम करताना 4 दिवसांत कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने चार नव्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याबाबत नियमांना या आठवड्यात अंतिम स्वरूप प्राप्त करण्यात येणार आहे.  मसुद्यावर शेवटचा हात फिरवणं सुरू आहे. हे कायदे अंमलात आल्यावर देशात कामगार धोरणात नव्या प्रणालीला सुरूवात होणार आहे.
     एप्रिल महिन्यापासून कर्मचार्‍यांच्या हातात कमी पगार येण्याची शक्यता आहे. नवीन कामगार विधेयकांत बदल झाल्यामुळे असे घडणार आहे. या बदलानुसार सरकार कामाचे तास, पीएफचे नियम बदलण्यात आले आहेत. येणार्‍या काळात ग्रॅज्यूएटी, पीएफ, कामाच्या तासांमध्ये मोठा बदल पहायला मिळू शकतो. यामुळे कर्मचार्‍यांच्या ग्रॅज्यूएटी आणि पीएफमध्ये वाढ होणार असल्याचे सांगितलं जातंय. मात्र हातात येणारा पैसा म्हणजे टेक होम सॅलरी कमी होणार आहे ही कर्मचार्‍यांसाठी काळजीची बातमी आहे.
ग्रॅज्यूएटी आणि पीएफमध्ये वाढ झाल्याने रिटायरमेंटनंतर मिळणार्‍या पैशांमध्ये देखील वाढ होणार आहे. कंपन्यांच्या बॅलन्स शीटवर देखील याचा परिणाम दिसून येणार आहे. गेल्या वर्षी संसदेत पारित केले गेलेले तीन कामगार विधेयकं 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. वेतनाच्या नव्या परिभाषेनुसार, भत्ते एकूण सॅलरीच्या जास्तीत जास्त 50 टक्के असतील.

No comments:

Post a Comment