अक्षय बहिरवाडे यांची लिंगायत गवळी समाज युवक प्रतिनिधीपदी नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 25, 2021

अक्षय बहिरवाडे यांची लिंगायत गवळी समाज युवक प्रतिनिधीपदी नियुक्ती

 अक्षय बहिरवाडे यांची लिंगायत गवळी समाज युवक प्रतिनिधीपदी नियुक्ती


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाजाची राज्यस्तरीय बैठक नुकतीच कार्याध्यक्ष भेटू नामागवळी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शिर्डी येथे संपन्न झाली. बैठकीस सखाराम गेण्णाप्पा (धुळे), विजय नाईक (पुणे), नामदेव लंगोटे (नगर), बाळासाहेब हिरणवाळे (नाशिक) आदिंसह राज्यातील पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी गवळी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्याचप्रमाणे संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने नुतन पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. यामध्ये राज्य कार्यकारिणीवर युवक प्रतिनि धी म्हणून अहमदनगरचे अक्षय सिदाप्पा बहिरवाडे यांची निवड करण्यात आली. अक्षय बहिरवाडे यांच्या निवडीबद्दल आ.संग्राम जगताप, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, प्रकाश भागानगरे, संतोष गेनप्पा,  विशाल भागानगरे, बंडू लंगोटे, रवी चवंडके आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment