भाजपच्या भिंगार मंडलात बुथ संपर्क अभियानात प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

भाजपच्या भिंगार मंडलात बुथ संपर्क अभियानात प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर

 भाजपच्या भिंगार मंडलात बुथ संपर्क अभियानात प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर

केंद्राच्या योजनांचा लाभ बुथस्तरावरील नागरिकांपर्यंत पोहोचावा

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः सक्रिय कार्यकर्त्यांचे प्रचंड असे जाळे भारतीय जनता पक्षाचे वैभव आहे. जनसामान्यांच्या अडीअडचणीत भाजपचे कार्यकर्ते धावून जात असतात. बूथ पातळीवर सूक्ष्म नियोजन करताना प्रत्येकाने घराघरात भाजपचा राष्ट्रवाद पोहचेल असं काम करणे अपेक्षित आहे. केंद्राच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ बुथस्तरावरील नागरिकांपर्यंत पोहोचावा. संघटनशक्तीच्या जोरावरच सशक्त, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास भाजपचे नगर जिल्हा प्रभारी मनोज पांगरकर यांनी व्यक्त केला.
   भाजपच्या बुथ संपर्क अभियानांतर्गत भिंगार मंडलाचे  कार्यकर्ता प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना पांगरकर बोलत होते. महेंद्र गंधे म्हणाले की, करोना काळात नगर शहरासह भिंगार मंडलात भाजपने लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी योगदान दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय धीरोदात्तपणे देशाला करोना महामारीत योग्य दिशा दिली. बूथ संपर्क अभियानातून केंद्राचं हेच काम आपल्याला घरोघरी पोहचवायचे आहे. शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणारे कृषी कायदे उत्तम असताना विरोधक भ्रम निर्माण करायचा प्रयत्न करीत आहे. हे थांबविण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कायदे समजून घेत लोकांमध्ये जागृती केली पाहिजे. भिंगार परिसरात प्रधानमंत्री पथविक्रेता स्वनिधी योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजे. भिंगार मंडलाला संपूर्ण ताकद देण्याचं काम पक्षाकडून होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
   प्रास्ताविकात वसंत राठोड यांनी सांगितले की, भिंगार मध्ये कोरोना काळात किराणा माल वाटप, नागरिकांना हॉस्पिटलची मदत, अर्सेनिक गोळ्याचे वाटप, पी. एम. केअर फंड गोळा करणे तसेच कोरोना योद्ध्यांचा सन्मान, पोलिस कर्मचारी, बँक कर्मचारी, स्वच्छता कामगारांचा सत्कार असे उपक्रम यशस्वीपणे राबवून जनतेशी संवाद साधला.प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहात फळवाटप, वृक्षारोपण करण्यात आले. तसेच आत्मनिर्भर भारत अंतर्गत पथविक्रेता स्वनिधी योजनेचा शुभारंभ करून सुमारे 500 नागरिकांना लाभ मिळवून दिला. त्यात एलओआरचे वाटप खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे हस्ते करण्यात आले. सूत्र संचालन महेंद्र जाधव यांनी केले. आभार किशोर कटोरे यांनी मानलेयावेळी शहर जिल्हाअध्यक्ष महेंद्र ऊर्फ भैय्या गंधे, संघटन सरचिटणीस अ‍ॅड. विवेक नाईक, युवाअध्यक्ष महेश तवले, सरचिटणीस आशिष आनेचा, शहरजिल्हा उपाध्यक्ष शिवाजी  दहिहंडे, सरचिटणीस महेश नामदे,तुषार पोटे, शहर कार्यकारिणी सदस्य  लक्ष्मीकांतजी तिवारी, भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड, नगरसेविका शुभांगी  साठे, ज्येष्ठ कार्यकर्ते दामोदर माखीजा, बाळासाहेब पतकेयुवा अध्यक्ष किशोर कटोरे, महिला आघाडी अध्यक्षा ज्योत्स्ना मुंगी, वैशाली कटोरे, उपाध्यक्ष संतोष हजारे, राजु दहिहंडे, सुरेश तनपुरे, गणेश साठे, सरचिटणीस ब्रिजेश लाड, सुरज रवे, खजिनदार आनंद बोथरा, गौतम कांबळे,कवित रासने, सौरभ रासने,  कमलेश धर्माधिकारी, स्वप्नील शेलार, सचिन फिरोदिया, शिवकुमार वाघुंबरे, विनायक फल्ले, खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक संदीप हाके, प्रितम तागडकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment