सावता परिषदेच्या 14 वा वर्धापन दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

सावता परिषदेच्या 14 वा वर्धापन दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन

 सावता परिषदेच्या 14 वा वर्धापन दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन

समाजाकरिता आपणास काय करता येईल, यादृष्टीने काम केले पाहिजे- सुवर्णा जाधव
नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाज जागृतीचे मोठे काम केले. त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श आज आपण सर्वानी पुढे चालवला पाहिजे. समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांसाठी काम करणे हीच शिकवण आपल्या संत व थोर राष्ट्रपुरुषांनी दिलेली आहे. सावता परिषदेच्या माध्यमातून तोच वारसा पुढे चालविण्याचे काम होत आहे. समाज काय म्हणेल, यापेक्षा समाजांकरिता आपणास काय करता येईल, यादृष्टीने काम केले पाहिजे. सावता परिषदेच्या माध्यमातून गेल्या अनेक  वर्षांपासून सुरु असलेल्या उपक्रमांतून अनेकांना फायदा झाला आहे. या उपक्रमातून लोक जोडण्याचे काम होत असल्याने एक चांगला समाज निर्मिती करण्याचा प्रयत्न सावता परिषदेच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी केले. सावता परिषदेच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे  नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.
   याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गणेश बनकर म्हणाले, सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली परिषदेच्या माध्यमातून समाजातील प्रश्न सोडविण्याचे काम सुरु आहे. यामध्ये युवक, विद्यार्थी, महिला यांच्याबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न परिषदेच्या माध्यमातून करण्यात येतो. त्याचबरोबरच वृक्षारोप, शालेय विद्यार्थ्यांना मदत, महिला बचत गटांतून महिलांचे संघटन आणि सक्षमिकरण, युवकांना नोकरी, रोजगाराविषयी मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांद्वारे गेल्या 14 वर्षापासून संघटन सुरु आहे. परिषदेच्या या कार्यात अनेकजण जोडले जाऊन सहकार्यही करत आहेत. जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या सहकार्याने संघटनेचे कार्य वाढत असून, यापुढील काळात आणखी व्यापाक स्वरुपात परिषद काम करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी निखिल शेलार, दत्ता जाधव, सुनिल गायकवाड आदिंनी मनोगतातून सावता परिषदेच्या कार्याचा गौरव करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गणेश शिंदे, गोरक्षनाथ गाडेकर, दिनेश बेल्हेेकर आदि उपस्थित होते.  प्रास्तविकात उपाध्यक्ष सुदाम लोंढे यांनी सावता परिषदेच्या गेल्या 14 वर्षांपासून सुरु असलेल्या कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन डागवाले यांनी केले तर आभार गुलाब गाडिलकर यांनी मानले.याप्रसंगी  सावता परिषद जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, निखिल शेलार, उपाध्यक्ष सुदाम लोंढे, सरचिटणीस गुलाब गायकवाड, शहराध्यक्ष नितीन डागवाले, दत्ता जाधव, सुनिल गायकवाड, आदिनाथ गायकवाड, संदिप गाडिलकर, राजू नगरे, बाळासाहेब व्यवहारे, प्रकाश नेमाणे, रोहित सुरतवाले, ओंकार नेमाणे, निखिल सुरतवाले, सागर चौरे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment