शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी का.रं.तुंगार तर नंदकुमार हंबर्डे यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी का.रं.तुंगार तर नंदकुमार हंबर्डे यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड

 शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी का.रं.तुंगार तर नंदकुमार हंबर्डे यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवडनगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः रविवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी शिक्षक महासंघाची विशेष सर्वसाधारण सभा सिताराम सारडा शाळेत राज्य कार्यकारिणी निवडीसाठी आयोजित करण्यात आली होती.सभेत सर्वानुमते का.र.तुंगार यांची राज्याच्या अध्यक्षपदी तर नंदकुमार हंबर्डे यांची राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली.
सभेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी ड.एन.एम.हराळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड.जयदीप देशपांडे यांनी काम पाहिले. राज्यातील अनेक जिल्ह्यातून महासंघाचे पदाधिकारी , सदस्य सभेसाठी उपस्थित होते.खेळीमेळीच्या वातावरणात राज्य कार्यकारिणी निवड करण्यात आली.
   महासंघाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.त्यात दुग्धशर्करायोग म्हणजे तुंगार सरांच्या अध्यक्षपदी निवडीने नगर जिल्हयाला हा फार मोठा मान मिळाल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले.वर्षभर विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांनी हे वर्ष साजरे करण्याचे सभेत ठरले. सभेच्या यशस्वीतेसाठी का.र.तुंगार ,रघुनाथ ठोंबरे ,विठ्ठल उरमुडे ,नंदकुमार हंबर्डे ,विठ्ठल तिवारी ,राहुल बोरुडे ,शेखर उंडे , बी.एम.सूर्यवंशी ,पी.बी.पाटील सर्व जिल्हा पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले
   नूतन राज्य कार्यकारिणीमध्ये कांता रंगनाथ तुंगार,मारुती ज्ञानदेव पाटील,अशोक प्रभाकर मदाने,ज्ञानेश्वर बबन गायकवाड,प्रकाश दतात्रय देशपांडे,बाळासाहेब शंकरराव वाघमारे,विकास महादेव थिटे,सुभाष अर्जुनराव गांगुर्डे,मुसा नबीलाल तांबोळी,हरिहर व्यंकटराव चिवडे,नंदकुमार सदाशिव हंबई,गजानन सुखदेव इंगळे,शिवाजी सखाराम भंडणकर,संतोष बाबुराव आयरे,कृष्णा साहेबराव देशमुख,मधुकर दत्तात्रय पौळ आदींची निवड झाली.

No comments:

Post a Comment