अहमदनगर जिल्हा काँग्रेस च्यावतीने ना. बाळासाहेब थोरात यांचे वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताह - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

अहमदनगर जिल्हा काँग्रेस च्यावतीने ना. बाळासाहेब थोरात यांचे वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताह

 अहमदनगर जिल्हा काँग्रेस च्यावतीने ना. बाळासाहेब थोरात यांचे वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताह


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री ना बाळासाहेब थोरातयांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा काँग्रेसच्या सर्व संघटनांच्या माध्यमातून दिनांक 01 फेब्रुवारी 2021 ते 07 फेब्रुवारी 2021 या काळात काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी दिली.काँग्रेस बळकटीकरण सप्ताह याबाबत अधिक माहिती देताना श्री साळुंके म्हणाले, या सप्ताहा अंतर्गत अहमदनगर जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस युवक काँग्रेस व सर्व फ्रंटल संघटनांचे माध्यमातून जिल्ह्यातील 14 तालुके व अहमदनगर शहरात प्रत्येक ब्लॉक मध्ये कमीत कमी 07 कार्यक्रमाचे आयोजन काढण्यात आली असून जिल्ह्यात 01 फेब्रुवारी 2021 ते 07 फेब्रुवारी 2021 या सप्ताहात 100 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
    गाव तेथे काँग्रेस या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक ब्लॉक मध्ये 20 शाखा उद्घाटनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या सप्ताहात जिल्ह्यात 14 तालुके व नगरपालिका क्षेत्रात 300 शाखा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी दिली.सदर काँग्रेस बळकटीकरण सप्ताहा अंतर्गत आ.डॉ. सुधीर तांबे, आ. लहुजी कानडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा काँग्रेस व फ्रंटल संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांच्या जिल्हाव्यापी दौर्‍याची आखणी करण्यात आली असून सदर दौर्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.सदर दौर्‍यानुसार 03 फेब्रुवारी 2021 रोजी स. 10 वाजता पाथर्डी, दु. 02 वाजता शेवगाव तर सायं. 06 वाजता नेवासा, 04 फेब्रुवारी 2021 रोजी स. 10 वाजता पारनेर, दु. 02 वाजता नगर तालुका तर सायं. 06 वाजता अहमदनगर शहर, 05 फेब्रुवारी 2021 रोजी स. 10 वाजता श्रीगोंदा, दु. 02 वाजता कर्जत तर सायं. 06 वाजता जामखेड, 06 फेब्रुवारी 2021 रोजी स. 10 वाजता राहुरी, दु. 02 वाजता राहाता तर सायं. 06 वाजता कोपरगांव, 07 फेब्रुवारी 2021 रोजी स. 10 वाजता अकोले, दु. 02 वाजता संगमनेर तर सायं. 06 वाजता श्रीरामपुरयेथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी दिली. जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या काँग्रेस बळकटीकरण सप्ताहातील सर्व उपक्रमांना जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व संघटनांच्या प्रमुखांनी व पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश झावरे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा अध्यक्ष अनिस शेख मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघमारे व सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाणे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment