नगरच्या ‘साईबन’ मध्ये पेट्सलव्ह (प्राणी प्रेम) हया नवीन अद्भुत दालनाचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

नगरच्या ‘साईबन’ मध्ये पेट्सलव्ह (प्राणी प्रेम) हया नवीन अद्भुत दालनाचा शुभारंभ

 नगरच्या ‘साईबन’ मध्ये पेट्सलव्ह (प्राणी प्रेम) हया नवीन अद्भुत दालनाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अहमदनगर येथील ‘साईबन’ कृषी पर्यटन केंद्र येथे रविवारी ‘पेट्सलव्ह’ (प्राणी प्रेम) ह्या नवीन अद्भूत दालनाचा शुभारंभ चि. स्मिरा व चि. प्रियांश ह्या बालकांच्या हस्ते करण्यात आला. ह्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा निसर्ग प्रेमी संस्थेचे अध्यक्ष पक्षीप्रेमी श्री जयराम सातपुते, शिल्पकार श्री प्रमोद कांबळे, वन्यछायाचित्रकार श्री राजेश परदेशी, साईबनचे संचालक डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सौ. सुधा कांकरिया, आर्कीटेक्ट श्री किरण कांकरिया, सौ ज्योती कांकरियांच्या उपस्थितीत करण्यात आला.
   आपणास ‘लहाणपणापासून प्राण्यांवर प्रेम करा’ अशी शिकवण नेहमी दिली जाते परंतू वाढत्या शहरीकरणामुळे फ्लॅट संस्कृतीमुळे लोकांना व विशेषत: लहान मुलांना प्राण्यांचा सहवास लाभत नाही केवळ पुस्तकात चित्रे पाहून समाधान करावे लागते. चि. स्मिरा हिच्या संकल्पनेत साईबन मध्ये असे काही असावे की जिथे मुलांना ससे, बदके, कोंबडया, मेंढया, बकर्या, गायीचे वासरू, घोडयाचे पिल्लू ह्यांना आपल्या हाताने स्पर्श करता यावा, लाड करता यावे व त्यांना आपल्या हाताने खाऊ घालता यावे त्यामुळे लहान मुलांमध्ये प्राणी प्रेम निर्माण व्हावे व जिज्ञासा ही पूर्ण व्हावी. अशी तिची संकल्पना मनाला खूपच भावली व साईबन जे माळरानाला पडलेले हिरवे स्वप्न आहे तिथे त्याला उभारण्यात आले. असे प्रतिपादन डॉ. सौ. सुधा कांकरिया ह्यांनी स्वागत करताना केले. ‘पेट्सलव्ह’ ह्या दालनात ससे, बदके, कबूतरे, कोंबडया, मेंढया, बकर्या, गायीचे वासरू ई. गोष्टी निसर्गाच्या सानिध्यात पटांगणात मोकळे फिरत असून येणार्या मुलांच्या हातात कोबीची पाने, गवत, गाजर, काकडीचे तुकडे असलेली छोटी बादली दिली जाते. ती लहान मुले त्यातील खाऊ त्यांना आपल्या हाताने खाऊ घालतात त्यांना मायेने हात लावतात त्यांच्या बरोबर फोटो काढतात व त्याचे त्यांना कौतुक असते. त्यामुळे प्राणी प्रेम वाढीस लागते व त्याचा संस्कार ही मुलांच्या मनात निर्माण होतो. ह्या दालनात बर्डपार्क (पक्षी उदयान) ही असून त्यात विविध देशी व परदेशी पक्षी व त्यांची माहिती ही मिळते. त्याच प्रमाणे छोटेसे मत्सालय असून त्यामुळे मुलांबरोबरच सर्व जणांच्या आनंदात भर पडते. त्याला लागून ‘वाईल्ड लाईफ’ वर (जंगली प्राण्यांचे) दालन असून तेथे जंगली प्राणी व पक्ष्यांचे छायाचित्र प्रदर्शन असून काही शिल्पेही मनाला साद घालतात. सापांविषयी माणसाच्या मनात भिती असते परंतू त्यांच्या विषयी माहिती व त्यांची उपयुक्तता ह्या वर एक प्रदर्शन दालन ह्यात आहे अशी माहिती संचालक डॉ. प्रकाश कांकरिया ह्यांनी दिली. जिल्हा निसर्गप्रेमी संस्थेचे अध्यक्ष श्री जयराम सातपूते ह्यांनी चि. स्मिरा ह्यांच्या ह्या संकल्पनोचे कौतुक केले व ह्या अभिनव उपक्रमामुळे नगरच्या वैभवात भर पडल्याचे सांगितले. चि. स्मिरा हीने आभार प्रदर्शन केले.

No comments:

Post a Comment