शिव पाणंद शेतरस्ते खुले करुन शेतकर्‍यांचा श्वास मोकळा करणार : तहसिलदार देवरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

शिव पाणंद शेतरस्ते खुले करुन शेतकर्‍यांचा श्वास मोकळा करणार : तहसिलदार देवरे

 शिव पाणंद शेतरस्ते खुले करुन शेतकर्‍यांचा श्वास मोकळा करणार : तहसिलदार देवरे

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी चालु केलेल्या महसुल विजय सप्तपदी अभियानाला पारनेरच्या तहसिलदारांनी मोहीमेचे स्वरुप देवुन पारनेर तालुक्यातील शेतरस्तेपिडीत शेतकर्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असुन पारनेर तालुका शेतरस्ते खुले करण्याच्या प्रक्रीयेत अव्वल करण्यासाठी  शेतकर्यांसोबत गावकर्यांनीही आपले मोलाचे योगदान देवुन पुढच्या पिढीसाठी नवा आदर्श करावा. - शरद पवळे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सुरु केलेल्या महसुल विजय सप्तपदी अभियानाला बळकट करण्यासाठी पारनेर तालुक्यातील  शिव पाणंद शेतरस्ते नवनिर्माण कृती समितीच्यावतीने पारनेर तहसिलवर पारनेर तालुक्यातील शेतकर्यांना विजय सप्तपदी अभियानातुन शेतरस्ते खुले करण्यासाठी पारनेर तहसिलवर मार्गदर्शन करुन शेतकर्यांना अर्ज बनवताना येणार्या समस्यांच निवारण करुन सर्व प्रकारच्या शेतरस्त्यांसाठी एक विशिष्ट अर्जाचा नमुना बनवुन तहसिलदार ज्योती देवरे यांच्या संमत्तीने सर्व शेतकर्यांचे अर्ज यावेळी भरुन घेतलेॠ
यावेळी तहसिलदारांनी सन्मापुर्वक शेतकर्यांना बोलावुन गावोगावच्या प्रत्येक शेतकर्याबरोबर चर्चा करुन समस्या समजुन घेतल्या यावेळी तहसिलदारांनी शेतरस्ते पिडीत माजी सैनिक शेतकर्याचा 20 वर्षांपासुन चालु असलेला संघर्ष संपवण्यासाठी सप्तपदी अभियाची सुरुवात माजी सैनिकाच्या शेतरस्त्याला खुले करुन सप्तपदीच पहील पावुल टाकणार व शेतरस्त्यांना विरोध करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असुन 31 मार्च पर्यंत तालुक्यातील शेतकर्यांनी आपले अर्ज पारनेर तहसिलमध्ये सादर करावेत असे शिव पाणंद शेतरस्ते नवनिर्माण कृती समीतीच्या वतीने अवाहन करण्यात आले यावेळी शिव पाणंद शेतरस्ते नवनिर्माण कृती समितीचे शरद पवळे,संजय कनिच्छे,रघुनाथ कुलकर्णी,भास्कर शिंदे,संपत जाधव,पांडुरंग कळमकर,अशोक आबुज,विजयसिंग मल्लाव,रावसाहेब पवार,बाळासाहेब औटी यांनी विशेष प्रयत्न करत नवा आदर्श तालुक्यामध्ये निर्माण केला.

No comments:

Post a Comment