लोखंडी रॉड डोक्यात मारला; मेली नाही म्हणून डोक्यात दगड घातला! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

लोखंडी रॉड डोक्यात मारला; मेली नाही म्हणून डोक्यात दगड घातला!

 लोखंडी रॉड डोक्यात मारला; मेली नाही म्हणून डोक्यात दगड घातला!

‘त्रिशा’ रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला बिलगून झोपली...

निर्घुण धक्का दायक


औरंगाबाद ः मानवी चेहरा विकृततेच्या किती आहारी गेलाय? नाती-गोती जपणारी भारतीय संस्कृतीच्या आधुनिकतेच्या काळात कशा ठिकर्‍या उडाल्या आहेत ही दर्शविणारी ही औरंगाबाद मधील घटना म्हणजे कौर्याची परिसीमाच जणू.. चिमुरड्या मुलांच्या डोळ्यासमोर पत्नीची लोखंडी रॉडने हत्या करणारा औरंगाबाद शिवारातील पळशी येथील सिद्धेश हा नराधम. पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्यावर ती वेदनेने रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असताना तिच्या डोक्यावर मोठा दगड घातला असताना प्रत्यक्ष आई प्राण सोडत असताना तिला पाहणारी लहान मुले किती अभागी?

....आणि मुले आईच्या मृतदेहाजवळ खेळत होती
खुनानंतर सिद्धेश लोखंडी ग्रीलला कुलूप लावून पसार झाला. त्यानंतर पाच वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी संध्याकाळपर्यंत घरातच होती. दिवसा मुलाने टीव्हीदेखील लावला. शेजार्‍यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलगा हॉलमध्ये होता. मुलगी मृत आईजवळ झोपली होती. नंतर तीही हॉलमध्ये येऊन बसली. तिचे अंगदेखील रक्ताने माखलेले होते. हॉलमध्ये एका ठिकाणी तिने शौच केले होते. परंतु दुपारपर्यंत मुले रडली कशी नाही, शेजारच्यांना त्यांचा आवाज आला कसा नाही, हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. विशेष म्हणजे मोठ्या मुलाचा 11 फेब्रुवारीला वाढदिवस झाला. त्यांनी तो मोठ्या जल्लोषात साजरा केला. 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डेदेखील साजरा केला होता.
मुलाने घटना सांगितली
सिद्धेशने आधी व्यायामाच्या रॉडने कवितावर वार केले. त्यानंतर गॅलरीत कपडे धुण्यासाठी ठेवलेल्या दगडाने तिचा चेहरा ठेचला. हा प्रकार मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान झाला असावा, असे त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाच्या बोलण्यातून समोर आले. त्यामुळे त्याच्यासमोर हा खून झाल्याचा अंदाज आहे. खुनानंतर सिद्धेशने बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुतले. स्वयंपाकघराजवळ असलेल्या बाथरूमच्या दिशेने पायाचे रक्ताचे ठसे आढळले.
तीन दिवसांपूर्वी मुलाचा वाढदिवस, नंतर व्हॅलेंटाइन डे साजरा करून अवघे चोवीस तास होत नाहीत तोच क्रूर पतीने काल मध्यरात्री पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड व कपडे धुण्याचा दगड घालून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना पिसादेवी गावात घडली. कविता सिद्धेश त्रिवेदी (30) असे मृत महिलेचे नाव आहे. खून केल्यानंतर पती लोखंडी गेटला कुलूप लावून पसार झाला. पाच वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी तब्बल सोळा तास आईच्या मृतदेहाजवळ खेळत होते.
पिसादेवीतील रुक्मिणी स्क्वेअर अपार्टमेंटमध्ये सिद्धेश हा पत्नी कविता व दोन मुलांसह राहत होता. तो कृषी उत्पन्न बाजार समितीत कनिष्ठ लिपिक आहे. त्याच्या घराचा लाकडी दरवाजा उघडा होता तर लोखंडी गेटला कुलूप लावलेले होते. त्यामुळे शेजार्‍यांना लोखंडी ग्रीलमधून मुले खेळत असल्याचे दिसले. दुपारनंतर मात्र मुलांच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. साधारण तीन-चार वाजेपासून रडणारी दोन्ही मुले संध्याकाळपर्यंत रडतच असल्याचे पाहून शेजारील कुटुंबातील महिलेने गेटजवळ जाऊन मुलांना काही खायला हवे का, असे विचारले. मात्र, त्यांचे रडणे थांबत नसल्याने त्रिवेदी दांपत्य घरात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शेजार्‍यांनी कुलूप तोडण्याचा निर्णय घेतला. कुलूप तोडल्यानंतर आत गेलेल्या शेजार्‍यांना स्वयंपाकघरात रक्ताचे ठसे दिसले आणि त्यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ चिकलठाणा पोलिसांना कॉल केला.पोलिसांनी धाव घेतली असता कविता रक्ताच्या थारोळ्यात बेडरूममधील पलंगावर पडलेली दिसली.

No comments:

Post a Comment