पोलिओला हद्दपार करण्यासाठी डोस घेणे आवश्यक - महापौर वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 1, 2021

पोलिओला हद्दपार करण्यासाठी डोस घेणे आवश्यक - महापौर वाकळे

 पोलिओला हद्दपार करण्यासाठी डोस घेणे आवश्यक - महापौर वाकळे

मनपाच्यावतीने पोलिओ अभियान मोहिमेचा देशपांडे रुग्णालयात शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राष्ट्रीय पोलिओ अभियानाचा शुभारंभ मनपाच्यावतीने बाळासाहेब देशपांडे रुग्णालय येथे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते बाळास डोस पाजून करण्यात आला. याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून भारतात नियमित राबविलेल्या पोलिओ लसीकरणामुळे भारतात पोलिओचे निर्मुलन झाले आहे. शासनाच्यावतीने सातत्याने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे हे शक्य झाले आहे. अशा विविध लसी या बालकांना दिल्यास बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत असते. या लसींचे सकारात्मक परिणाम हे दुरगामी असल्याने प्रत्येक पालकांनी आपल्या बालकास लस ही दिलीच पाहिजे. शासनाच्यावतीने यासाठी विशेष मोहिम राबविली जात असते, त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे.  पोलिओला हद्दपार करण्यासाठी हा डोसे घेणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्यावतीने हे लसीकरण मोफत केले जात असल्याने नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित म्हणाले, बालकांचे आरोग्य अबाधीत राहावे, यासाठी शासनाच्यावतीने सातत्याने लसीकरणाचे कार्यक्रम हाती घेण्यात येत असतात. या लसीकरणामुळे आज अनेक रोग निर्मुलनाचे कार्य झाले आहे. पोलिओसारख्या घातक आजाराचा नायनाट केलेला आहे, तरी सुद्धा काळजी घेणे आवश्यक असल्याने या राष्ट्रीय पोलिओ कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे असे सांगितले.
याप्रसंगी आरोग्य अधिकारी अनिल बोरगे म्हणाले, नगर शहरात पोलिओचे अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. यामध्ये 46280 बालकांना डोस देण्यात येणार असून, त्यासाठी 374 बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 750 कर्मचारी काम करत आहे, यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नर्सेस, आरोग्य विभागातील कर्मचारी कार्यरत आहेत. ही मोहिम पुढील पाच दिवस शहरात राबवून राहिलेल्या बालकांना घरोघरी जाऊन हा पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. तसेच विविध सामाजिक संस्थांच्या मदतीनेही पोलिओ डोससाठी सहकार्य करत असल्याचे सांगितले.याप्रसंगी महिला बालकल्याण समितीच्या लता शेळके यांनी या अभियानाविषयी जागृता निर्माण करुन सर्वांनी आपल्या बालकांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन केले.याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित, महिला बाल कल्याण सभापती लता शेळके, उपसभापती सुवर्णा गेनप्पा, नगरसेवक विपुल शेटीया, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.आरती ढापसे, डॉ.सुजोत सैंदाणे, आरोग्य सेविका एस.डी.क्षेत्रे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment