डॉ.लहाने यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 1, 2021

डॉ.लहाने यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

 डॉ.लहाने यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

फडणवीस सरकारने त्रास दिला; तर महाविकास आघाडी सरकारने न्याय दिला


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्यातील वंजारवाडी येथे संत वामनभाऊ आणि भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना सामजभूषण पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला. तर महाविकास आघाडी सरकारने मला न्याय दिला’, असा खळबळजनक गौप्यस्फोट लहाने यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे संपूर्ण परिसरात एकच चर्चा रंगली.

अहमदनगर जिल्ह्यातील वंजारवाडी येथे संत वामनभाऊ आणि भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने तात्याराव लहाने यांना सामजभूषण पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी भाषण केले. त्या भाषणात म्हणाले की, ’फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार आले आणि त्यांनी मला न्याय मिळवून दिला. महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी माझी बाजू मांडून मला शासनस्तरावर काम करण्याची संधी दिली. तसेच मुंडे यांना चांगल्या कामांसाठी आपला पाठिंबा आहे’, असे देखील ते पुढे म्हणाले.या कार्यक्रमात तात्याराव लहाने यांनी लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्याचा विशेष सल्ला दिला. तसेच त्यांनी सांगितले की काही गोष्टी आपण प्रमाणाच्या बाहेर खातो. उदारणार्थ. गाजर, पपई, शेवग्याची शेंग. परंतु, याचे प्रमाणात सेवन करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.’अनेक गाव खेड्यात अजूनही जातीवरुन गावाची नावे आहेत.
मात्र, जातीवरुन गावाचे नाव नसावे. कारण ते आपल्याला शोभण्यासारखे नाही. तसेच ते आपल्याला परवडणारेही नाही. त्यामुळे गावकर्‍यांनी ग्रामसभेत ठराव घेऊन आपल्या गावांची नावे बदलावी आणि संत, महामानवांच्या किंवा महापुरुषांच्या नावाने गावाची नावे ठेवावी’, असे मत धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमात मांडले.

प्रशासन आणि शासनात कुणीही कुणाला त्रास देऊ नये. सलोख्याने प्रशासन चालावं असं सर्वांना अपेक्षित असतं. डॉ. तात्याराव लहान हे एका वरिष्ठ पदावर रुजू आहेत. त्यांनी प्रशासन आणि शासन यांच्यातील अंतर्गत वादाला माध्यमांसमोर आणणे योग्य नाही. - प्रविण दरेकर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here