हळदी कुंक समारंभात महिलांना ध्यानधारणेचे धडे देण्याचा सहजयोग परिवाराचा उपक्रम महत्त्वपूर्ण : धनश्री विखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 1, 2021

हळदी कुंक समारंभात महिलांना ध्यानधारणेचे धडे देण्याचा सहजयोग परिवाराचा उपक्रम महत्त्वपूर्ण : धनश्री विखे

 हळदी कुंक समारंभात महिलांना ध्यानधारणेचे धडे देण्याचा सहजयोग परिवाराचा उपक्रम महत्त्वपूर्ण : धनश्री विखे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ध्यानधारणामुळे आपल्या जीवनात अमुलाग्र बदल होतात हे संपूर्ण जगाने स्वीकारले आहे. जाती धर्माच्या पलीकडे जात आता ध्यानधारणेचे महत्व वाढले आहे. ध्यानधरणेमुळे माझ्यात झालेल्या बदलांचा आनंद मी घेत आहे. सहजयोगा मध्ये सुद्धा ध्यानास महत्व सांगितले आहे. सहजयोगातील ध्यानधारणा सर्वांनी स्वीकारून आपल्या जीवनात बदल घडवावेत. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमा निमत्त महिलांना ध्यानधारणेचे धडे देण्याचा सहजयोग परिवाराने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला आहे, असे प्रतिपादन धनश्री विखे यांनी केले.श्री निर्मलादेवी प्रणीत सहजयोग परिवाराच्या नगर शाखेच्या वतीने मकर संक्रांत निमित्त आयोजित हळदी कुंकू समारंभात धनश्री विखे बोलत होत्या. यावेळी डॉ. प्रिया मिटके, डॉ. माधुरी नलावडे, कार्यक्रमच्या संयोजिका माजी नगरसेविका वीणा बोज्जा, अ‍ॅड. शारदा लगड आदींसह विविध क्षेत्रातिल महिला उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांच्या हस्ते निर्मलादेवींच्या प्रतिमेची महाआरती करून सर्वांना तिळगूळ व वाणाचे वाटप झाले. महिलांना ध्यानधारणेचे महत्व सांगण्यात आले. सर्वांनी घेतलेल्या उखाण्यांनी कार्यक्रमाचा समारोप झाला.यावेळी बोलतांना डॉ.प्रिया मिटके म्हणाल्या, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथामध्ये सहजयोगाचे महत्व सांगितले आहे. सध्याच्या वातावरणात महिलांना ध्यानधारणा करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे सहजयोगाच्या शिकवणीचे सर्वांनी पालन करावे.
प्रास्ताविकात वीणा बोज्जा म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून नगरच्या सहजयोग परिवाराच्या वतीने हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत. गेल्या 10 महिन्यापासून घरात बसलेल्या महिला यानिमित्ताने बाहेर पडून एकत्र आल्या.कार्याक्रमचे सूत्रसंचलन शीतल ठोंबरे यांनी केले. आभार गीता सातपुते यांनी मानले. यावेळी रेणुका अजमाने, छाया ढाकणे, कांचन भुजबळ, सुनिता शिंदे, जयश्री सामलेटी, रुपाली रोह्कले, वासंती वैद्य, सुनंदा तोगे, वाणी सोनावणे आदि उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment