नगरच्या विकासासाठी प्रयत्न कमी पडत आहे - अभियंता चंद्रकांत जावळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

नगरच्या विकासासाठी प्रयत्न कमी पडत आहे - अभियंता चंद्रकांत जावळे

 नगरच्या विकासासाठी प्रयत्न कमी पडत आहे

मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रकांत जावळे यांची खंत


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जगातील विकसित देशाप्रमाणे आपल्या भारताचाही विकास व्हावा असे कायम वाटत आहे. विकासित देशांमध्ये इंजीनियरीयंग क्षेत्रात खूप सुधारणा झाली असल्याने तेथे वेगाने विकास होत आहे. आपल्या देशाच्याही वेगाने विकासासठी आधुनिक इंजीनियरीयंग आपणही स्वीकारले पाहिजे. नगरही विकास झाले पाहिजे असे प्रत्तेकजण म्हणतो पण प्रयत्न कोणीच करतांना दिसत नाही, अशी खंत पुणे मेट्रो पॉलेटीयनचे मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रकांत जावळे यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, पुढील काळात होणारे विकास कामे जास्तीतजास्त दर्जेदार, उत्कृष्ठ व पारदर्शी पद्धतीने व्हावीत. नगर मधील बिल्डर असोशिएशन व अधिकार्‍यांमध्ये चांगले समन्वय आहे. असोशिएशनच्या सदस्यांनी सामाजिक जाणीव जपली आहे. नगरमध्ये अभियंता म्हणून काम करतांना खूप काही शिकावयास मिळाले आहे. जुनी ओळख असलेले सर्वजण भेटल्याचा आनंद आहे.नगरमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून काम केलेले चंद्रकांत जावळे यांना नुकतेच पुणे मेट्रो पॉलेटीयनचे मुख्य कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती मिळाली आहे. याबद्दल बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेच्या वतीने त्यांचा माजी कुलगुरु डॉ.सर्जेराव निमसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी असोशिएशनचे चेअरमन मच्छिंद्र पागीरे, संस्थापक जवाहर मुथा, माजी अध्यक्ष महेश गुंदेचा, सा.बा. कार्यकारी अभियंता जे.डी.कुलकर्णी, कार्यकारी अभियंता एस.डी.पवार, कार्यकारी अभियंता ए.व्ही.चव्हाण, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता सानप, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण, वल्ड बँक शाखेचे कार्यकारी अभियंता एन.एन.राजगुरू, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एन.डी. कुलकर्णी आदींसह बिल्डर असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी डॉ.सर्जेराव निमसे म्हणाले, तंत्रज्ञानात जागतिक स्तरावर मोठा बदल होत असल्याने इंजीनियरिंग क्षेत्रातही बदल होत आहे.

No comments:

Post a Comment