महाराष्ट्र भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ द्वारा शिवगान स्पर्धेचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 5, 2021

महाराष्ट्र भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ द्वारा शिवगान स्पर्धेचे आयोजन

 महाराष्ट्र भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ द्वारा शिवगान स्पर्धेचे आयोजन

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः यंदाच्या शिवजयंती निमित्त महाराष्ट्र स्तरावर भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या (सेल) वतीने भव्य शिवगान स्पर्धा 2021  चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हास्तरावर अहमदनगर येथे आद्य नाट्याचार्य भरतमुनी यांच्या जयंतीचे निमित्त साधून दि. 9 फेब्रुवारी रोजी, खंडेलवाल भवन, जॉगिंग ट्रॅक जवळ सावेडी, अहमदनगर या ठिकाणी संपन्न होईल तर अंतिम फेरी शिवजयंती दिनी 19 फेब्रु. रोजी अजिंक्यतारा गड सातारा येथे संपन्न होणार आहे.
स्पर्धा केवळ शिवरायांवरील स्तुती गीतांची असून त्यात पोवाडा, पाळणा, आरती, स्फुतीगीते, अभंग, ओवी,ललकारी आदी प्रकारचे गीत सादर करता येईल. ही स्पर्धा खुली असून कलाकाराचे वय किमान 12 वर्षे पूर्ण असायला हवे. स्पर्धकांसाठी प्रवेश विनामूल्य असेल. प्राथमिक फेरीत वैयक्तिक शिवगान स्पर्धेत प्रथम, दिव्तीय व तृतीय क्रमांक मिळवणार्यांड संपर्धकास अनुक्रमे रु. 7000, 5000, व 3000 आणी सांघीक प्रथम, दिव्तीय व तृतीय येणार्‍या संघास अनुक्रमेरु. 11000, 7500, 5100 रोख रक्कम, स्मृतीमचन्ह व प्रमाणपत्र देण्यात येतील.प्रवेश घेण्यासाठी 7276355148, 9028171441 यांना संपर्क करावा, शिवगान स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील अधिकाधिक गायक कलावंतांनी सहभागी व्हावे असे महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेश सहसंयोजक गितांजली ठाकरे, संयोजक विशाल जाधव, खा. डॉ. सुजय विखे पा., महापौर बाबासाहेब वाकळे, शहरजिल्हाध्यक्ष भैया गंधे, सांस्कृतिक प्रकोष्ठ जिल्हा स्पर्धा संयोजक अमित गटणे यांनी आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here