ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळण्यासाठी निर्माण होणार्‍या त्रूटी दूर कराव्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 1, 2021

ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळण्यासाठी निर्माण होणार्‍या त्रूटी दूर कराव्या

 ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळण्यासाठी निर्माण होणार्‍या त्रूटी दूर कराव्या

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचा नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख यांनी त्यांचा सत्कार करुन ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शन प्रश्नी निवेदन दिले. यावेळी आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री ना. पवार शहरात आले असता त्यांना सदरचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र सरकारने राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु केली आहे. ही पेन्शन मिळण्यासाठी शासनाच्या जाचक अटी असून, मोजक्याच ज्येष्ठ पत्रकार बांधवांचा यामध्ये समावेश झाला आहे. तर अनेक ज्येष्ठ पत्रकार सदर पेन्शन मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. ज्येष्ठ पत्रकारांना हक्काची पेन्शन मिळण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन पेन्शन मिळण्यासाठी निर्माण होणार्‍यात्रूटी दूर करुन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment