झिने सरांचे शैक्षणिक कार्य गौरवशाली- ना. प्राजक्त दादा तनपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 1, 2021

झिने सरांचे शैक्षणिक कार्य गौरवशाली- ना. प्राजक्त दादा तनपुरे

 झिने सरांचे शैक्षणिक कार्य गौरवशाली- ना. प्राजक्त दादा तनपुरे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः न्यू इंग्लिश स्कूल शेंडी विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ झिने सर यांनी आपल्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात केलेले कार्य हे गौरवशाली असल्याचे प्रतिपादन ऊर्जा तथा नगर विकास राज्यमंत्री नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी केलेनगर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ झिने हे प्रदीर्घ सेवेतून शुक्रवारी सेवानिवृत्त झाले त्याबद्दल नामदार तनपुरे यांनी त्यांचा शेंडी येथे विद्यालयात जाऊन सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की येत्या काही वर्षात राहुरी नगर विधानसभा मतदारसंघाचा माझा संपर्क आल्यानंतर मला जी काही प्रेमाची माणसे भेटली त्यामध्ये झिने सरांचा उल्लेख करावा लागेल सरांनी शिक्षण सेवेत असताना क्रीडाशिक्षक होऊन अनेक मुलांना घडवले शाळेचे वातावरण चांगले कसे राहील शाळेच्या विकासात ग्रामस्थांचा सहभाग कसा राहील हा हेतू डोळ्यासमोर ठेवल्याने ते शाळेचे नव्हे तर त्या गावचे लाडके शिक्षक झाले.ज्ञानदानाचे काम करताना सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली घरची परिस्थिती बेताची होती म्हणून  शेती व दूध व्यवसाय करून शिक्षक म्हणून नोकरी करणे व परत समाजात मिसळून समाज उपयुक्त कामे करणे हे फक्त झिने सरच करू शकतात  यापुढील काळात त्यांनी  संपूर्ण वेळ आता आमच्या बरोबर समाजसेवेत वाहून घ्यावे हे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले झिने सरांच्या व ग्रामस्थांच्या विनंतीवरून त्यांनी आपल्या निधीतून  संपूर्ण शाळेच्या मैदानाला पेव्हर्स ब्लॉक बसून नेण्यासाठी निधी जाहीर केला. यावेळी त्यांनी रघुनाथ झिने यांचा सत्कार केला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोविंद अण्णा मोकाटे, सौ मंगला झिने, नंदू गागरे,केशव बेरड,शेंडी चे सरपंच सिताराम दाणी, पोखर्डी चे सरपंच प्रवीण जावळे आदींसह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment