देशात प्रथमच महिला आरोपीला होणार फाशी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

देशात प्रथमच महिला आरोपीला होणार फाशी

 देशात प्रथमच महिला आरोपीला होणार फाशी


मुंबई :
स्वतंत्र भारतात प्रथमच महिलेला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेशातल्या अमरोहामधील शबनम या महिलेनं 2008 साली आपल्या प्रियकरासोबत आपल्या नात्यातल्या 7 जणांचा कुर्‍हाडीने खून केला होता. या प्रकरणात शबनमला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
राष्ट्रपतींनीही तिचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. मथुरा जेलमध्ये तिला फाशी होईल. फाशीच्या अंमलबजावणीची तयारी सुरू झाली आहे. निर्भया प्रकरणातल्या आरोपांना फाशी देणारा पवन जल्लादचीच या फाशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. फाशीची तारीख मात्र अजून निश्चित झालेली नाही. मथुरा जेलमध्ये जवळपास दीडशे वर्षांपूर्वीच महिला फाशीघर बनवण्यात आलं पण तिथे आत्तापर्यंत कोणाही महिलेला फाशी दिली नाही. मात्र आता इथे शबनमला फासावर लटकवण्यात येईल. पवन जल्लादने दोन वेळा या फाशीघराचं निरीक्षण केलं आहे. त्याला त्यात फाशीचं तख्त आणि लिव्हरमध्ये काही दोष जाणवले आहेत. ते तातडीने दुरूस्त केले जात आहेत. बिहारमधील बक्सरमधून फाशीसाठी दोरखंड मागवण्यात आला आहे.  अमरोहामध्ये राहणारी शबनमने 2008 मध्ये आपल्या प्रियकरासोबत मिळून कुटुंबातील सात जणांवर कुर्‍हाडीने हल्ला केला. या प्रकरणात शबनमला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment