खर्डा येथे गणेश जयंती उत्सव साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

खर्डा येथे गणेश जयंती उत्सव साजरा

 खर्डा येथे गणेश जयंती उत्सव साजरा 


खर्डा -
  जामखेड तालुक्यातील खर्डा येथील गणेश जयंती निमित्त श्रद्धा गणेश मंडळाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .  गणेश मंदिरात नित्यनेमाने पुरोहित कडून आरती करण्यात येते. मुख्य बाजार पेठेत  आसणारे गणेश मूर्तीचे पालखी मध्ये मिरवणूक काढून गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आले.
            सोमवार दि.१५ रोजी गणेश जयंती निमित्ताने येथे गणेश मूर्ती चे रथातून मिरवणूक काढण्यात आले होते .   गणेश मुर्ती पुरातन काळापासून या ठिकाणी आहे. पहाटे व रात्री विधीवत पूजा पुरोहित कडुन नित्यनेमाने करण्यात येते .या ठिकाणी मुख्य  व्यापार पेठ असल्याने पुर्ण देखरेख व्यावसायिक दुकानदार   करतात यांच्याच नियोजनाने श्रद्धा गणेश मंडळांच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश जयंती उत्सव कार्यक्रम करण्यात आला . यावेळी पुरोहित भाऊ लाडंगे व गणेश काळे यांच्या मंत्रोच्चार ने २१ आर्वतन अभिषेक करण्यात आला.व शहारातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.गणपती बप्पा मोरया या जयघोषणाने परिसर भक्ती मय झाला होता.संध्याकाळी  राम हवेली  मध्ये गणेशजन्म सोहळा साजरा करण्यात आला यामध्ये महिलाचे सहभाग मोठ्या प्रमाणात होते .  नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य महेश दिंडोरे व वैजीनाथ पाटील यांनी आलेल्या सर्व गणेश भक्तांना महाप्रसादाचे  आयोजन करण्यात आले होते . 
          यावेळी ग्रामपंचायत सदस्य महलींग कोरे, राम वाले, राजू तंटक,संतोष रसाने ,किशोर शेवाळे ,बापू ढगे, अमोल जायभाय,महेश मूळे, प्रशांत चावणे,सचिन रोकडे,बंडू चावणे, दीपक गोलेकर, हनुमंत गोलेकर, संभाजी साबळे सतीश तंटक आदी  मंडळातील कार्यकर्त्याने कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment