एशियन फार्मशीच्या कल्पक उपक्रमाद्वारे ग्राहकांना उच्च प्रतिची आरोग्य सेवा मिळणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 18, 2021

एशियन फार्मशीच्या कल्पक उपक्रमाद्वारे ग्राहकांना उच्च प्रतिची आरोग्य सेवा मिळणार

 एशियन फार्मशीच्या कल्पक उपक्रमाद्वारे ग्राहकांना उच्च प्रतिची आरोग्य सेवा मिळणार

अन्न, वस्त्र निवार्‍या बरोबरच आता औषधाची गरज- आ. संग्राम जगताप

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः आजच्या बदलत्या जिवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. मानसाच्या मुलभूत गरजा पैकी अन्न, वस्त्र ,निवा-या बरोबरच आता औषधाची भर पडली आहे. त्यामुळे आता उच्च प्रतिचे आणि सर्वांना परवडतील अशी औषधे मिळणे ही काळाची गरज आहे. एशियन फार्मशीच्या माध्यमातून नगरकरांना आरोग्य सेवा दिली जाईल. आधुनिकतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. या कल्पक उपक्रमाद्वारे नगरकरांना उच्च प्रतिची आरोग्य सेवा मिळणार आहे. कोरोनाच्या काळात समाजाचे मानसिक , शारिरिक आरोग्य टिकवण्यामध्ये डॉक्टर, नर्स सर्व आरोग्य कर्मचा-यां बरोबरच फार्मशिष्ट बांधवांनीही जिवावर उदार होवून मोलाचे कार्य क्रले आहे. कोवीडच्या काळामध्ये एशियन र्फामशीच्या माध्यकातून औषधे मिळून देण्याचे काम त्यांनी केले. एशियन फार्मशी व्यवसाय म्हणून नव्हे तर सामाजिक बांधीलकी म्हणून काम करते.  एशियन फार्मने बदलत्या काळानुसार पाऊले उचलली व शहरामध्ये 24 तास मेडिकल सेवा देण्याचे काम सुरू केले. डॉक्टरां प्रमाणेच आता शहरातील अनेक युवक एकत्र येवून मेडिकलच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला. असे प्रतिपादन आ. संग्रामभैय्या जगताप यांनी केले.
   प्रोफेसर कॉलनी चौक येथे एशियन फार्मशी दालनाचे उद्घाटन आ.संग्रामभैय्या जगताप यांचे शुभहस्ते झाले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभैय्या गंधे, माजी नगरसेवक किशोर डागवाले, अभय आगरकर, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, विनीत पाऊलबुधे, निखील वारे, बाळासाहेब पवार, योगीराज गाडे, सचिन शिंदे, अप्पा नळकांडे, विपुल शेटीया, प्राचार्य भास्करराव झावरे, डॉ.नितीन नागरगोजे, डॉ.नितीन पांडुळे, डॉ.जगदीश चहाळ, डॉ.अनिल जाधव, डॉ.गणेश माने, डॉ.मुकुंद विधाते, डॉ.पुनम विधाते, डॉ.हर्षवर्धन तन्वर, डॉ.पंकज मते, डॉ.विकास लबडे, डॉ. दमण काशिद, डॉ. सचिन लांडगे, डॉ. संतोष राठोद्व, डॉ.संतोष गांगर्डे, डॉ. निळकंठ म्हस्के, डॉ. अरविंद गिते आदी उपस्थित होते.
   यावेळी डॉ.नितीन नागरगोजे म्हणाले की,आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यकरत असताना केवळ व्यसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जाणिवेतून रूग्णसेवा घडली पाहिजे त्यासाठी 24 तास उच्च प्रतीची आरोग्य यंत्रणा उभी करणे महत्वाचे आहे. एशियन फार्मशीच्या माध्यमातून नगरकरांना 24 तास उच्च दर्जेची औषधे माफक दरात उपलब्ध होणार आहे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. कोरोनाच्या संकटामुळे समाजामध्ये आरोग्याची जनजागृती होत आहे. आणि याच जागृतीतून आपल्याला समाजाचे उत्तम आरोग्य घडवायचे आहे.
   यावेळी दत्ता गाडळकर म्हणाले की, एशियन फार्मशीच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रोफेसर कॉलनी येथे 24 तास मेडिकल उघडे राहील व सर्व प्रकारची औषधे माफक दरात ग्राहकांना मिळतील आम्ही शहरातील युवक एकत्र येवून एशियन फार्मशीच्या माध्यमातून ग्राहकांना चांगली सेवा देवू असे ते म्हणाले. यावेळी एशियन फार्मशीचे संचालक दत्ता गाडळकर, मनोज खेडकर, अभिजीत गांगर्डे, रेनुल गवळी, युवराज खेडकर, किरण रासकर, भुपेंद्र खेडकर, पराग झावरे, मा.श्री.योगेश कटारे यांनी सुत्रसंचालन केले व मनोज खेडकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here