स्थायी समिती सभापतीची निवडणूक होणार या दिवशी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

स्थायी समिती सभापतीची निवडणूक होणार या दिवशी.

 स्थायी समिती सभापतीची निवडणूक 4 मार्चला.

राष्ट्रवादीचा सभापतीपदावर दावा..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 4 मार्चला स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक होत असून स्थायी सभापती राष्ट्रवादीचा की भाजपाचा याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीकडून अविनाश घुले सभापती पदाचे प्रमुख दावेदार आहेत.
त्यांच्याविरोधात अर्ज दाखल होतो की घुले बिनविरोध सभापती होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीबाबतचा प्रस्ताव नाशिक येथील विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला होता. त्यास विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थायी समितीत सेनेचे पाच, तर भाजपाचे चार सदस्य आहेत. परंतु, सेनेकडून सभापती पदासाठी एकही सदस्य इच्छुक नाही. भाजपातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. भाजपकडूनही सदस्यांना कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे सदस्यांनीही राष्ट्रवादीच्या सुरात सूर मिसळला असून, ऐनवेळी पक्षाकडून आदेश आल्यास भाजपकडून अर्ज दाखल केला जाऊ शकतो. सेनेनेही या निवडणुकीतून अंग काढून घेतले आहे. सेनेचे पाच सदस्य आहेत. परंतु, त्यांनाही पक्षाकडून आदेश नाही. सेनेत शांतता असल्याने ऐनवेळी सेना काय भूमिका घेते, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते.

No comments:

Post a Comment