कंटेनमेंट झोन बाबत केलेला निर्णय 31 मार्च पर्यंत कायम. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

कंटेनमेंट झोन बाबत केलेला निर्णय 31 मार्च पर्यंत कायम.

 कंटेनमेंट झोन बाबत केलेला निर्णय 31 मार्च पर्यंत कायम.



नगरी दवंडी


मुंबई :  महाराष्ट्र, केरळ सह सात राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकारने अधिक कडक भूमिका घेतली आहे. मार्गदर्शक तत्त्वे तसेच कंटेनमेंट झोनबाबत केलेले नियम ३१ मार्चपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यांनी वेळीच प्रतिबंधात्मक पावले उचलली नाहीत तर आम्ही अधिक कडक धोरण राबवू, असा इशारा केंद्राने दिला आहे. कोरोना साथ नियंत्रणात आणण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा कालावधी महिनाभर वाढविण्यात आला आहे. 

गुरूवारी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोविडचे रुग्ण वाढले असून 1,51,708 कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. भारतातील 7 राज्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्रासह केरळ, पंजाब, मध्यप्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि छत्तीसगडचा समावेश आहे. 

राज्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्चपासून सुरू होत आहे. त्यासाठी आज केंद्र आणि राज्य सरकारची महत्त्वाची बैठक होत आहे. लसीकरणासाठी मुंबईत 100 केंद्र तैनात करण्यात आलीयत. एकट्या मुंबईत 25 लाख जणांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरील लसीकरण कार्यक्रमासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी डय़ुटी जॉइन करण्यासाठी अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी काल केंद्र सरकारने महानगरपालिकेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. आज राज्य सरकारसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत तिसऱया टप्प्याच्या लसीकरणाची रणनीती ठरणार आहे. कोरोनाचा प्रसार मुंबईत वाढत असला तरी एका दिवसात सातशे इमारती प्रतिबंधमुक्त करण्यात आल्या आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने पाच बाधित रुग्ण सापडले तरी संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यामुळे गेल्या आठवड्यात सील इमारतींची संख्या १३०५ वर पोहोचली होती. मात्र गेल्या दोन दिवसांत यामध्ये पुन्हा घट दिसून येत आहे. यापूर्वी १० बाधित रुग्ण सापडल्यानंतर इमारत सील करण्यात येत होती. मात्र त्यात बदल करून पाच बाधित रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येऊ लागल्या. त्यामुळे आठवडाभरापूर्वी सील इमारतींची संख्या वाढली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून एक हजारांवर रुग्ण नोंदवले जात असताना सील इमारतींची संख्या झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment