पोलीस गस्त वाढविण्याची गरज : नगरसेविका पुष्पा बोरुडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

पोलीस गस्त वाढविण्याची गरज : नगरसेविका पुष्पा बोरुडे

चोरांचा धुमाकूळ!
पोलीस गस्त वाढविण्याची गरज : नगरसेविका पुष्पा बोरुडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या महिनाभरापासून चोरांनी शहर परिसरामध्ये धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना चोरांपासून संरक्षण मिळावे यासाठी पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करावा. व पोलिस गस्त वाढवावी अशी मागणी नगरसेविका पुष्पा बोरुडे यांनी तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
   पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नागरिक घरात असतानाही भरदिवसा चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ होत आहे.की, पोलिसांची चोरांना भीती नसल्यासारखेच ते वावरत आहेत. यासाठी पोलिसांनी कणखर भूमिका घेऊन चोरांचा बंदोबस्त करावा. बालिकाश्रम रोड, धर्माधिकारी मळा व कल्याण रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चोऱयांचे प्रमाण वाढले आहे. घराच्या कंपाऊंडमधून दुचाकी गाड्यांची चोरी करत आहेत. तसेच बंद घरांचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात ऐवज लंपास करत आहेत. यासाठी पोलिसांची गस्त वाढवून चोरांचा बंदोबस्त करावा. याचबरोबर बालिकाश्रम रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात क्लासेस, कॉलेज असल्यामुळे या भागातील नागरिकांना रोडिरोमिओंचा त्रासही सहन करावा लागत आहे, यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी,असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी बोलताना अनिल बोरुडे म्हणाले की, दिवसाढवळ्या चोऱयांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचबरोबर महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे हिसकावून नेण्याच्या प्रमाणात वाढ झाले असल्याने महिलांना बाहेर फिरणेही अशक्य झाले आहे. भुरट्या चोर्‍या, घरफोड्या तसेच धाडसी चोरीतही वाढ होत आहे. याचबरोबर रोडरोमिओंच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने पोलिसांनी गस्ती वाढवून याचा बंदोबस्त करावा, असे ते म्हणाले. यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक शाम नळकांडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment