भन्नाट बॅनर.. मिळालेली मते 12.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 22, 2021

भन्नाट बॅनर.. मिळालेली मते 12..

 भन्नाट बॅनर.. मिळालेली मते 12..

मतदारांचे मानले आभार

लातूर -
काही दिवसांपूर्वी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला. सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. अनेकांना पराजयाचा सामना करावा लागला. तर ज्यांचा विजय झाला, त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला. दरम्यान निवडणुकीत हरल्यानंतर अनेक जण घराबाहेर पडत नाही. पण लातूर तालुक्यातील जळकोट येथील कोनळी डोंगरी ग्रामपंचायतीच्या विकास शिंदे कोनाळीकर तरुणाने निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे चक्क बॅनर लावले आहेत. जरी तो ग्रामपंचायतीत पडला असला तरी त्याने बॅनरमुळे सोशल मीडियावर अनेकांची मनं जिंकली आहेत. विकास शिंदे याच्या बॅनरने संपूर्ण राज्यात लक्ष वेधून घेतलं आहे.

   काय लिहिले आहे बॅनरमध्ये? -  विकास शिंदे कोनाळीकर म्हणतात की, ‘वाटलं होतं गड्या आपला गाव बरापण तुम्ही म्हणालो पसारा भरा. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. समाजन धिकारलं गावानं नाकारलं पण आम्हाला देश स्विकारणार! आमच्यावर जिवापाड प्रेम करणार्‍या बारा मतदारांचे जाहीर आभार.’
   ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी आमचा लढा मातीसाठी जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी. मला ज्यांनी बारा मते देऊ संघर्ष करण्याचे ताकद दिली त्यांचे सात जन्मही उपकार फिटणार नाही. तुमच्या मताचं देशात नावाचं करीन. खंडेराया नगरीचे पराभूत उमेदवार विकास शिंदे कोनाळीकर’
   ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी जल्लोष साजरा करण्यासाठी अनेक भन्नाट गोष्टी केल्या. पण विकास शिंदे कोनाळीकर याच्या बॅनरने विजयी झालेल्या उमेदवारांनाही मागे टाकलं आहे. त्याने त्याचे अफलातूल मनोगत या बॅनरवर लिहिले आहे. त्यामुळे सध्या या बॅनरच्या चर्चेला उधाण आलं आहे.
विकास शिंदे कोनाळीकार याचे पॉलिटेक्निकचे शिक्षण सुरू असून पुण्यात तो काही काळासाठी राहत होता. त्यानंतर गावाचा विकास करण्यासाठी त्याने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे ठरवले. पण यामध्ये योग्य राजकीय कसबही लागते याची जाणीव त्याला ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर झाली. ग्रामपंचायत निवडणुकीत त्याला अवघी बारा मतंच मिळाली होती. त्यामुळे तो खूप निराश झाला होता. पण तरी ज्या बारा मतदारांनी विकासवर विश्वास दाखवला, त्याचे जाहीर आभार मानण्याची त्याची स्टाईल भन्नाटच होती.

No comments:

Post a Comment