आबासाहेब जर्‍हाड मुख्यमंत्र्यांचे सचिव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 22, 2021

आबासाहेब जर्‍हाड मुख्यमंत्र्यांचे सचिव

 आबासाहेब जर्‍हाड मुख्यमंत्र्यांचे सचिव


अहमदनगर ः
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक रहिवासी असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी आबासाहेब एकनाथराव जर्‍हाड यांची यांची नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव म्हणून नियुक्ती झाल्याने संगमनेर तालुक्यात सह अश्विनी पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे. ते यापूर्वी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व नारायण राणे यांचे सचिव याचबरोबर त्यांना प्रशासकीय कामाचा दीर्घ अनुभव असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1997 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत यापूर्वी त्यांनी अनेक मोठ्या पदांवर उल्लेखनीय काम केले असून त्यांचे ठाणे जिल्हाधिकारी पदाची कारकीर्द विशेष लक्षणीय ठरले आहे राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाण्याच्या सर्वांगीण अभ्यास करत जिल्ह्यातील आदिवासी बहु दुर्गम तालुक्यामध्ये जिल्हा व उत्पन्नाची विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध करून देत त्यांनी आदिवासी समाजाला स्वयंपूर्ण स्वावलंबी बनवण्यासाठी लक्षणीय कामगिरी केली आहे.

No comments:

Post a Comment