रेशन कार्डला आधार लिंक न केल्यास... रेशन बंद? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 9, 2021

रेशन कार्डला आधार लिंक न केल्यास... रेशन बंद?

 रेशन कार्डला आधार लिंक न केल्यास... रेशन बंद?


मुंबई :
रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास 1 फेब्रुवारीपासुन रेशन बंद होणार असल्याची माहिती अन्नधान्य पुरवठा अधिकार्‍यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणार्‍या सर्व रेशनकार्ड धारकांना आपला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक केलं आहे. आता पर्यंत 10 लाख 61 हजार 822 लाभार्थ्यांचं आधार लिंक पूर्ण झालं आहे. मात्र अद्याप तीन लाखांहून अधिक लाभार्थीचं आधार लिंकीग होणं बाकी आहे.

   रेशनकार्डातील प्रत्येक सदस्याने रेशन दुकानावर आपले आधार कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे. आधार कार्डावरुन तुमचं रेशन आधारसोबत लिंक केलं जाणार आहे. यासाठी तुमचा हाताचा ठसा देखील स्कॅन केला जाणार आहे. कुटुंबातील एक व्यक्तीचा मोबाईल नंबर देखील द्यावा लागणार आहे. स्वस्त धान्याचा लाभ गरजू व्यक्तींना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे बोगस रेशनधारक पुढे येणार आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आणखी पारदर्शकता आणण्यासाठी ही मोहिम राबवली जात आहे. 31 जानेवारीपर्यंत आधार लिंक करण्याची मुदत देण्यात आली आहे. आधार लिंक न केल्यास 1 फेब्रवारीनंतर रेशन दिलं जाणार नाही.

No comments:

Post a Comment