आ.जगताप, आ. लंकेंची पवारांशी चर्चा; खा. सुजय विखेंचे मात्र मौन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 9, 2021

आ.जगताप, आ. लंकेंची पवारांशी चर्चा; खा. सुजय विखेंचे मात्र मौन.

 आ.जगताप, आ. लंकेंची पवारांशी चर्चा; खा. सुजय विखेंचे मात्र मौन.

‘व्हीआरडीई’ स्थलांतरास सर्वांचाच विरोध!
‘व्हीआरडीई’च काय ? कोणताही प्रकल्प बाहेर जावू देणार नाही- खा. शिंदे
काँग्रेस थोरातांच्या संपर्कात, शिवसेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
  माजी खासदार दिलीप गांधी व्ही आर डि ई च्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचेशी बोलणार आहेत. आज व्ही आर डी ई अधिकारी व कर्मचारी यांची शिष्टमंडळाला केंद्रीय संरक्षण समिती सदस्य खासदार श्रीकांत शिंदे यांची ठाणे येथे भेट घेऊन स्थलांतर थांबवावे अशी विनंती केली. आ. संग्राम जगताप, आ. निलेश लंके यांनी राष्ट्रवादी नेते शरद पवारांना या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर शहराचे वैभव व प्रतिष्ठा असणारा ‘व्हीआरडीई’ (व्हेईकल रिसर्च अ‍ॅड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट) हा प्रकल्प अहमदनगर मधुन स्थलांतर करण्यास  भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस पक्षाचा विरोध असून सर्वच पक्ष हा प्रकल्प शहरातून जाऊ नये यासाठी प्रयत्न करीत असताना विद्यमान खासदार सुजय विखें मौन बाळगून असल्याचे दिसत आहे.
   नगरमधील व्हीआरडीई स्थलांतराच्या प्रयत्नाबाबत येथील अधिकारी व कर्मचार्यांनी केंद्रीय संरक्षण समितीचे सदस्य खासदार श्रीकांत शिंदे यांची ठाणे येथे भेट घेऊन स्थलांतर थांबवावे, अशी विनंती नगरमधील व्हीआरडीई बचाओ आंदोलनाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली. यावेळी दुर्गेश गाडेकर, एम.जाधव, पी.जी.गवळी, के.बी. करोसिया आदि उपस्थित होते. सदर निवेदन मंत्री एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आले.
   यावेळी खा.श्रीकांत शिंदे यांनी नगरच्या व्हीआरडीई संदर्भात माहिती घेऊन स्थलांतराबाबत आपण केंद्रीय संरक्षण समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करुन हे स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न करु. तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना याबाबत लक्ष घालण्यास सांगून  खा.संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे सर्व खासदार संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करु, असे आश्वासन दिले. हा प्रश्न नगरचा नसून, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने महाराष्ट्रातील कोणताही प्रकल्प राज्यबाहेर जाऊ देणार नाही.  या संदर्भात लवकरच दिल्ली येथे सर्वपातळ्यांवर प्रयत्न करणार असल्याचे खा.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
   संपूर्ण भारतात नगरचे नाव व्ही आर डी  ई  मुळे परिचित आहे . परंतु आता हि संस्था नगरमधील आपले युनिट बंद करून दुसर्‍या राज्यात स्थलांतरित होत आहे. त्यामुळे या संस्थेवर अवलंबून असलेली 2000 हजार कुटूंबे उध्वस्त होणार आहे .तसेच याचा बाजारपेठ व अर्थ व्यवस्थावर मोठा परिणाम होणार आहे .तरी याबाबत आपण स्वतः लक्ष घालून केंद्र सरकार च्या संरक्षण खात्याशी संपर्क साधून हि संस्था या ठिकाणाहून जाऊ नये यासाठी मार्ग काढण्यात यावा, असे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात येऊन जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करण्यात आली यावेळी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसुंदर, संजय शेडगे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड़, शाम नळकांडे, विजय पठारे, दत्ता जाधव, संतोष गेनपा, संग्राम कोतकर, मुना भिगारदीवे, संतोष तनपुरे, बापूसाहेब बनकर, अनिल निकम, विशाल गायकवाड़, स्वप्नील ठोसर, अक्षय नागपुरे आदी उपिस्थत होते.  व्हीआरडीई परराज्यात मी स्थलांतरीत होऊ देणार नाही, वेळप्रसंगी मोठा लढा उभारू असा आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी व्हीआरडीई च्या सर्व कर्मचार्‍यांना विश्वास दिला. दि. 6 जानेवारी 2021 रोजी व्हीआरडीई येथे आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी समस्त कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी व त्यावर अवलंबून असलेल्या अस्थापनेतील कर्मचारी यांची भेट घेऊन याविषयी सविस्तर माहिती घेऊन या गंभीर परिस्थितीवर चर्चा केली. याप्रसंगी बोलताना आमदार संग्रामभैय्या जगताप म्हणाले की, या प्रश्नी यासंबंधीत अधिकार्‍यांसह तात्काळ जेष्ठ नेते आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची मी भेट घेणार आहे. पवार साहेबांशी या विषयावर माझे प्राथमिक बोलणेही झाले असून केंद्र सरकारकडे देखील याविषयी पाठपुरावा करण्यात येईल. वेळप्रसंगी मोठा लढा उभारू पण व्हीआरडीई मी स्थलांतरित होऊ देणार नाही.
   देशाची फाळणी झाली त्यावेळी सध्या पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडीजवळील  चखलाला प्रांतातून व्हिआरडीईचे नगरमध्ये स्तलांतर करण्यात आले होते. माझ्या नगर जिल्हयासाठी देशाच्या स्वातंत्र्यानंतरची ती आठवण आहे. सध्या ही संस्था नगर येथून चेन्नई येथे हालविण्याच्या हालचाली सुरू असून त्यास आपला ठाम विरोध आहे. यासंदर्भात आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेउन निवेदन सादर केले असून खा. पवार यांनी दिलेल्या अश्वासनाप्रमाणे लवरकच या प्रश्नी संरक्षण मंत्र्यांची भेट घेण्यात येणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी बोलताना सांगितले. व्ही आर डी ई संशोधन संस्था अहमदनगर येथून चेन्नई येथे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या त्या घटनेचा काँग्रेसच्या इंटक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अभिजीत लुणिया यांनी केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी यात लक्ष घालून ही संस्था अहमदनगर येथून हलवून देऊ नये यासाठीचे आवाहन त्यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment