भाजपाचा स्वतंत्र पॅनल; मुंबईत बैठक संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 21, 2021

भाजपाचा स्वतंत्र पॅनल; मुंबईत बैठक संपन्न

 भाजपाचा स्वतंत्र पॅनल; मुंबईत बैठक संपन्न

जिल्हा सहकारी बँक निवडणूक..

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा बँकेसाठी अनेक आजी माजी मंत्री आणि आमदारांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या असून जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. अहमदनगर जिल्हा बँकेसाठी 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. निवडणुकीसाठी सध्या अर्ज वाटपाला सुरुवात झाली असून मंगळवारी पहिल्या दिवशी 23 जणांनी 153 अर्ज घेतले आहेत.
सहकारी बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्यावतीने स्वतंत्र पॅनल उभा करण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले.नगर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. मातब्बल नेते भाजपमध्येच आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक स्वतंत्र लढल्यास बँकेवर भाजपचीच सत्ता येईल, असे जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी सांगितले. यावर फडणवीस यांनी स्वतंत्र लढण्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. याबाबतचे सर्व अधिकार फडणवीस यांना राहतील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आगामी काळात 21 जागांवर भाजप लढणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन नगर जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र काँग्रेस आणि शिवसेनेने यासंबंधी कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही. ह्या निवडणुकीसाठी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे, मंत्री शंकरराव गडाख, अशा दिगग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

No comments:

Post a Comment