दुसर्‍यांच्या उपयोगी पडणे हीच खरी मानवसेवा : अमोल पटवा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 21, 2021

दुसर्‍यांच्या उपयोगी पडणे हीच खरी मानवसेवा : अमोल पटवा

 दुसर्‍यांच्या उपयोगी पडणे हीच खरी मानवसेवा : अमोल पटवा

अहमदनगर ः समाजातील गरजवंतांना मदत करणे हीच आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. साधूमहंतांनी नेहमीच दुसर्यांच्या उपयोगी पडण्यातून मोठा आनंद मिळतो हाच संदेश कृतीतून दिला आहे. जैन ओसवाल वात्सल्य संस्था असेच परोपकारी काम करीत असून त्यात सहभागी होण्यातून समाधान प्राप्त झाले. आपल्या मदतीतून एखाद्याच्या चेहर्यावर हास्य फुलले पाहणे खरोखरच आनंददायी असते असे प्रतिपादन महावीर ज्वेलर्सचे अमोल पटवा (कडावाला) यांनी केले.
जैन ओसवाल वात्सल्य संस्थेच्यावतीने 70 गरजूंना किराणा वाटप करण्यात आले. यावेळी स्व.श्रेयांस अमोल पटवा यांच्या स्मरणार्थ पटवा परिवाराने या मदतीसाठी योगदान दिले. याप्रसंगी  संस्थेचे अध्यक्ष अजित बोरा, सेक्रेटरी विजय गुगळे, जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन ईश्वर अशोक बोरा, जय आनंद मॉनिर्ंग ग्रुपचे अध्यक्ष नंदलाल कोठारी, किशोर पितळे, सतिष मुथा, फुलचंद बागर, मिठुलाल मेहेर, नूतन गांधी, संतोष कर्नावट, मयुर गुगळे आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठीे, सौरभ बोरा, प्रमिलाताई बोरा, अशोक (बाबूशेठ) बोरा, चंपालाल मुथा, सुनील मुनोत, पनालाल बोगावत, रसिक बोरा, , किशोर गुगळे, अभय श्रीश्रीमाळ, महेश गुंदेचा आदींचे योगदान लाभले.

No comments:

Post a Comment