सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आस्थापनांना ई आर विवरणपत्र सादर करणे बंधनकारक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 21, 2021

सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आस्थापनांना ई आर विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

 सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आस्थापनांना ई आर विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः केंद्र शासनाने सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसुचित करण्याची सक्ती करणारा) कायदा 1959 व नियमावली 1960 अन्वये जिल्हयातील सर्व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेमध्ये वेतनपटावरील कर्मचारी वर्गाची संख्या (ईआर-1 विवरणपत्र) प्रत्येक तिमाही संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आवश्यक आहे. माहे डिसेंबर 2020 ची माहिती 31 जानेवारी 2021 पूर्वी सादर करावी.
ज्या आस्थापनांनी त्यांची माहिती या ुुु.ारहरीुरूरा.र्सेीं.ळप वेब पोर्टलवर अपडेट करुन ईआर-1 सादर करावेत तसेच या वेबपोर्टलवर नविन आस्थापनेची नोंदणीकरुन घ्यावी. अथवा अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक 0241-2425566 यावर संपर्क साधावा असे आवाहन वि. जा. मुकणे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अहमदनगर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment