कोरोनातील रजा मंजूर करावी ः गाडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 21, 2021

कोरोनातील रजा मंजूर करावी ः गाडगे

 कोरोनातील रजा मंजूर करावी ः गाडगे

शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना कोरोना झाला होता त्यांनी उपचारासाठी त्या काळात रजा घेतलेली आहे. ती रजा  अर्जित रजेतून वजा केली जात आहे. तरी ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोरोना उपचारासाठी घेतलेली रजा स्पेशल लिव्ह म्हणून मंजूर करावी अशी मागणी शिक्षक भारतीने शिक्षणमंत्र्यांना भेटून  केली असल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.
आमदार कपील पाटील राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, कोरोना काळात ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोरोना झाला होता व त्यासाठी त्यांना दवाखान्यात उपचार घ्यावे लागले त्यासाठी शाळेत रजा घ्यावी लागली होती ती रजा स्पेशल रजा म्हणून मंजूर करावी व तसे आदेश काढावेत अशी मागणी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, जिल्हा माध्यमिकचे  सचिव विजय कराळे , कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे .योगेश हराळे, उर्दू माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष मोहमंद समी शेख माध्यमिकच्या महिला जिल्हाध्यक्षा आशा मगर उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु . उच्च माध्यमिक चे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर ङोंगरे , संभाजी पवार. हनूमंत रायकर. सुदाम दिघे. संतोष मगर . संजय तमनर. संतोष देशमुख . नवनाथ घोरपडे. गोरखनाथ गव्हाणे, श्रीकांत गाडगे .विलास गाडगे . संभाजी चौधरी   ,  किसन सोनवणे ,  , कैलास जाधव,   महिला सचिव विभावरी रोकडे . कार्याध्यक्ष मिनाक्षी सूर्यवंशी. रोहिणी भोर शकुंतला वाळुंज, छाया लष्करे. जया गागरे. संध्या गावडे. अनघा सासवडकर, रेवन घंगाळे . जॉन सोनवणे  आदींनी माहिती दिली  आहे.

No comments:

Post a Comment