बाळासाहेब ठाकरे यांची जयंती श्रीगोंद्यात विविध उपक्रमांनी साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 23, 2021

बाळासाहेब ठाकरे यांची जयंती श्रीगोंद्यात विविध उपक्रमांनी साजरी

 बाळासाहेब ठाकरे यांची जयंती श्रीगोंद्यात विविध उपक्रमांनी साजरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा शहरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या हस्ते पुष्पहार घालून तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप तसेच दिवसभर विविध उपक्रम राबवित साजरी करण्यात आली.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त श्रीगोंदा शहरातील शिवाजी चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पोलिस निरिक्षक रामराव ढिकले व शिवसेना तालुका प्रमूख बाळासाहेब दुतारे यांच्या हस्ते पुष्पहार घालून साजरी करण्यात आली. तसेच श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तर दिवसभर विविध उपक्रमांनी ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महीला आघाडीच्या मनिषा काळे, शहरप्रमूख संतोष खेतमालिश, युवासेना तालुका प्रमुख हरिभाऊ काळे, नाथाभाऊ पवार, हनुमंत लाटे, अक्षय खेतमालिस, संभाजी घोडके भाऊसाहेब म्हस्के, कुंडलिक घालमे, मयुर गोरे, रविंद्र खराडे, वर्षा चव्हाण, ज्योती थोरात, बालसैनिक संस्कृती काळे, जावेद फकीर, शिल्पा पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment