बेशिस्त वाहतुकीसंदर्भात शिव राष्ट्र सेना 26 रोजी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 23, 2021

बेशिस्त वाहतुकीसंदर्भात शिव राष्ट्र सेना 26 रोजी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार

 बेशिस्त वाहतुकीसंदर्भात शिव राष्ट्र सेना 26 रोजी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शहरातील राष्ट्रीय महामार्गातील अंतर्गत रस्ते यापासून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत चाललेला असून, शहरातील चौकातील बंद पडलेले सिग्नल व अनधिकृत थांबलेले वाहणे दिवसेंदिवस शहर विद्रुपीकरण करत असून, शहर एक मोठे खेडे दिसून येत आहे. याला संपूर्ण ट्राफिक डिपार्टमेंट जबाबदार आहे. त्यामुळे येत्या 26 जानेवारी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार असल्याबाबतचे निवेदन शिव राष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी पोलिस अधिक्षक यांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, शहर सुरक्षा सप्ताह हा वाहतुक शाखेकडून राबविलेला जात आहे. परंतु वाहतुकीबाबत शहराची दैयनिय अवस्था झालेली आहे.  जी फोर व्हीलर वाहणे खरेदी करताना व त्याची पासिंग करताना वाहन मालकास आरटीओ ऑफिस वाहन धारकास 7/12 उतारा मागते की त्याची फोर व्हीलर पार्किंग करत असतांना त्याच्या स्वत:च्या जागेत पार्किंग करावे या करीता. परंतु शहरात सर्रासपणे ट्रकापासून छोट्या वाहनांपर्यंत भर बाजारात व मोठ-मोठ्या ट्राफिक सिग्नलपाशी ही वाहणे दिमाखात उभी असतात. यांच्यावर ट्राफिक पोलिस कुठलिही कारवाई करत नाही. हे मोठे आश्चर्य आहे. गोर-गरीब नागरिकांना फक्त नियम दाखवून पावत्या फाडायचे काम चालू असते.
तसेच  जड वाहतुकीला प्रवेश नसतांना सुद्धा ट्राफिक पोलिस ही वाहने दिवसा शहरात सोडतात व त्यामुळे आतापर्यंत 700 ते 800 बळी या वर्षाअखेर घेतलेले आहेत ही मोठी शहराची शोकांतिका आहे. तसेच शहरात मोठ-मोठ रस्त्यावर व चौकातील सिग्नलवर मोकाट, भटकी जनावरे एखाद्या लग्नाच्या वर्हाडा सारखी उभी असतात. त्यामुळे दुर्घटना होतात. ट्राफिक पोलिस हे फक्त बघ्याची भुमिका घेतात हे आश्चर्य आहे.
तसेच शाळकरी मुलांची वाहतुक करणारे रिक्षा व बससे यांना कोणताच नियम नसून, मोठ्या संख्येने ही वाहतुक चालेली असते. तसेच हायवेच्या ठिकाणी मोठ-मोठी चाय स्पॉट व हॉटेल्स व गॅरेज हायवेला झालेले असून, याची सर्व पार्किंग रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून, यामुळे सामान्य नागरिकाला जीव गमवावा लागत आहे. यासर्व गोष्टींमुळे शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने 26 जानेवारी रोजी पालकमंत्री साहेबांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment