नगरचे नाव श्रीरामनगर करावे ः किरण डफळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 12, 2021

नगरचे नाव श्रीरामनगर करावे ः किरण डफळ

 नगरचे नाव श्रीरामनगर करावे  ः किरण डफळ


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानबादचे धाराशिव बरोबरच अहमदनगरचे नावही श्रीरामनगर करावे, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदनाद्वारे जय जिव्हेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण डफळ यांनी केली आहे.
   मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अब्जावधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेले प्रभु श्रीराम आणि सीतामाई यांनी 14 वर्षांच्या वनवासात बराचसा काळ नगर शहराजवळील डोंगरगण येथे वास्तव्य केले आहे. तेथे आजही त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत. त्यामुळे प्रभु श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भुमिला श्रीरामनगर हेच नाव योग्य राहिल.
   तसेच ज्यांच्या नावावर हे शहर वसलेले आहे, तो अहमद शाह हा मूळचा इथला नव्हताच तर तो परकिय होता. त्यामुळेच अहमदनगरचे नाव श्रीरामनगर असे बदलून या जिल्ह्याला लागलेला 530 वर्षांच्या कलंक पुसून टाकावा, अशी मागणी मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment