सोशल मीडियाच्या ‘दुहेरी’ फंड्याने प्रचारात वाढतेय रंगत..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 12, 2021

सोशल मीडियाच्या ‘दुहेरी’ फंड्याने प्रचारात वाढतेय रंगत..!

 सोशल मीडियाच्या ‘दुहेरी’ फंड्याने  प्रचारात वाढतेय रंगत..!

गावकारभार्‍यांच्या प्रचारास ‘नेट’कर्‍यांची ‘हटके’ प्रतिक्रिया

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः  नगर तालुक्यातील   ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचाराचा धुराळा आता चांगलाच उडू लागला असून सोशल मीडियाच्या दुहेरी फंड्या ने ग्रामपंचायत प्रचारास आता आगळी वेगळी रंगत आली आहे.
   निवडणूक प्रचाराने गावोगावी राजकीय वातावरण तापू लागले असतानाच  गावोगावच्या पारावरती, चौकाचौकातून, हॉटेल्स, ढाबे, पानटपर्‍या, टी स्टॉल, गल्ली बोळातून चर्चेचे फड रंगू लागले आहेत. उमेदवारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी देण्याबरोबरच निवडणुकीच्या प्रचारासाठी आता  सोशलमीडियाचा प्रभावीपणे वापर होत आहे. निवडणूक गावातील उमेदवार सोशल मिडीयचाचा अतिशय चाणाक्ष पद्धतीने वापर करून गावात आपलीच हवा असल्याचे दाखवत प्रचाराचा धुराळा उडवत आहेत.
   मात्र हा प्रचार होत असताना इंटरनेट अतिशय कुशलपणे हाताळणारे ’नेट’करीही आता आपल्या खुमासदार  शैलीतून निवडणूक  प्रचारास ’हटके’ स्टाइलने  प्रतिक्रिया देत आहेत. या सोशल मीडियाच्या दुहेरी फंड्याने गावकारभार्‍यांच्या प्रचारात एक आगळी वेगळी रंगत आली आहे.
   सोशलमीडियाच्या माध्यमातून राजकारणाचा दुसरा चेहराही लोकांच्या समोर येऊ लागला आहे. यातील दुसरी बाजू दर्शविणारे संदेश, फोटो, व्यंगचित्रे, ऑडिओ -व्हिडीओ क्लिप्स ह्या  व्हाट्सअप तसेच फेसबुक, ट्वीटर, इन्स्ट्राग्राम आदींच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत.
   यातून लोकांचे मनोरंजन तर होत आहेच पण याशिवाय मतदार जागृतीही होताना दिसत आहे. यातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिल्या  जाणार्‍या  पैशांच्या , दारूच्या  प्रलोभनातून दिले जाणारे आपले अनमोल मत वाया घालऊ नये, तसेच पुढार्‍यांची निवडणुकी पूर्वीची वर्तवणूक व निवडणुकी नंतरची लोकांविषयी असलेली वर्तवणूक दर्शविणारे व्यंगचित्रे,
   काही व्यंग चित्रांमधून नेतेमंडळी, अधिकारी, ठेकेदार, सरपंच व  पदाधिकारी हे शासनाकडून लाभार्थ्यांसाठी आलेला निधी स्वतःच हडप करताना दर्शवली आहेत.
   सोशल मीडियाच्या माध्यमातून अपलोड होणार्‍या  या मनोरंजनपर तथा  जनजागृती संदेशातून, व्यंगचित्रांतून तसेच फोटोतून नेटकरी आपली वेगळीच छबी निर्माण करताना दिसत आहेत. यामुळे गाव कारभार्‍यांच्या निवडणूक प्रचारात आगळी वेगळी  रंगत निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment