युवा ऊर्जास्रोत : स्वामी विवेकानंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 12, 2021

युवा ऊर्जास्रोत : स्वामी विवेकानंद

 युवा ऊर्जास्रोत : स्वामी विवेकानंद


विश्वातील अनेक संत, महंत, थोर विचारवंत, क्रांतिकारक यांनी  राष्ट्रे स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्रउत्थानासाठी आयुष्य वेचले तर काहींनी प्राणार्पण केले. मानव कल्याणाचा विचार सार्‍या विश्वाला देत. हिंदू संस्कृतीची जगाला नव्याने ओळख करून देत, ग्ल्यानी आलेल्या भारतीय महंतांना जागरूक केले. मानवी  जीवनाला व युवाशक्तीला ऊर्जा प्राप्त करून देणारा  महान संन्यासी योद्धा म्हणजे स्वामी विवेकानंद होय. स्वामीजींचे सारे आयुष्य प्रेरणादायी, संजीवन यगाने भरलेले आहे. पिढ्यान पिढ्या स्वामीजींच्या विचाराने नवीन पिढी तयार होऊन या भारतभूमीला सर्वोच्य शिखरावर नेले आहे. ‘जे जे सकारात्मक आहे ते ते सर्व स्वामी विवेकानंदांच्या विचारात आहे’. असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर स्वामीजींच्या विचारणाबाबत म्हणतात. अतुल्य योगदान व निरंतर प्रेरणादायी जीवन जगणार्‍या स्वामीजींच्या जन्मदिनी राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा होत असतो.

   स्वामीजीनी शिकागो परिषदेत आपल्या ओजस्वी वाणीतून जगाला हिंदू संस्कृतीची ओळख नव्हे तर व्याप्ती दाखवून दिली त्यांनी आपल्या भाषणातून एकूण 9 मुद्धे मांडले.  यातून त्यांनी विश्वबंधुत्व, स्वातंत्र्य,  समता, सहिष्णुताची देणगी दिली.  स्वामीजींच्या विचाराचा सार्‍या जगावर  इतका प्रभाव पडला जग त्यांना आपले मानू लागला. आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी व भेटण्यासाठी जग आतुर झाले होते. विचार ग्रहण करणार्‍या प्रत्येकाने नवा संकल्प घेऊन स्वामीजींचे विचार जगा  पुढे मांडले. हिच युवाशक्तीची प्रेरणा व ऊर्जास्रोत आहे. तो विचार आजच्या युवा पिढीने अवलंबला पाहिजे. तरच नैराश्य जाऊन एक चैतन्य निर्माण होईल.  
   अमेरिकेत होणार्‍या धर्म परिषदेला स्वामीजी जाण्यासाठी खेतडीच्या महाराजांनी त्यांना आर्थिक मदत दिली. शिवाय भगवे वस्त्र व भगवा फेटा दिला. जाताना कालिकामाता व रामकृष्णांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन सोबत भगवत गीता घेऊन प्रवासाला निघाले. अमेरिकेत पोहचल्यावर अनेक संकटे झेलत स्वामीजी न्यूयॉर्क शहरात राहिले.  त्यांना परिषदेला उपस्थित राहण्यासाठी तेथील प्रा. राईट यांनी मोलाचे सहकार्य केले. अखेर 11 सप्टेंबर 1893 शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेचा दिवस उजाडला. यात प्रत्येक धर्माचे धर्मगुरू व चार  ते पाच हजार नागरिकही उपस्थित होते. कार्डिनल गिरबन्स हे या धर्म महासभेचे अध्यक्ष होत. प्रत्येक धर्माच्या धर्मपंडितांनी आपला धर्म इतर धर्मा पेक्षा कसा चांगला आहे हे सांगत होते. परंतु जेंव्हा स्वामीजी उभे राहिले  माझ्या अमेरिकेतील बंधू भगिनींनो ” हे वाक्य उचारताच सार्‍या सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला.  हिंदू  संस्कृतीचे,सभ्यतेचे, सर्वसामावेशकता व सहिष्णुतेचे दर्शन सार्‍या जगाला झाले. त्यांनी हिंदुधर्मावरील परिपूर्ण असे भाष्य केले त्यांचे चैतन्यपूर्ण व ओजस्वी वाणीने सारे मंत्रमुग्ध झाले. 17 दिवस हि धर्मपरिषद चालली होती.
   धर्मसभेत सारे धर्मगुरू आपली भाषणे वाचवून दाखवत होते पण जेंव्हा स्वामीजी कोणताच कागद न घेता उभे राहिले.   माझ्या अमेरिकेतील बंधू भगिनींनो ” या स्नेहभावपुर्ण शब्दांनी सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला. या भाषणाची नोंद इतिहासात होत त्यावर अनेक विचारवंतांनी आभ्यास केला. अमेरिकन बंधू आणि भगिनींनो तुम्ही ज्या आदर आणि प्रेमाने माझं स्वागत केलं त्यामुळे माझं हृदय उचबंळून आलं आहे. जगातली सर्वांत जुनी संत परंपरा आणि सर्व धर्मांची भूमी असलेल्या भारत मातेतर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो. सर्व जाती आणि संप्रदायाच्या लाखो-करोडो लोकांतर्फे मी तुमचे आभार मानतो. या स्वामीजींच्या विचारानेच इतर धर्माच्या धर्मगुरूंना व अमेरिकन नागरीकांना ऊर्जा प्राप्त झाली.  स्वामीजींनी दुसर्‍या मुद्यांत सहिष्णुतेचा विचार ही पौर्वात्य देशांची जगाला देणगी आहे असा विचार माझ्या आधी काही वक्त्यांनी मांडला. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. स्वामीजींनी दुसर्‍याचा चांगला विचार अंगिकृत करत त्यांना धन्यवाद देतात. पुढे स्वामीजी म्हणतात मला गर्व आहे की माझा जन्म अशा धर्मात झाला आहे की ज्या धर्माने जगाला सहिष्णुता आणि सर्वधर्मांची स्वीकृती याची शिकवण दिली आहे. आम्ही केवळ सर्व धर्माचं स्वतंत्र अस्तित्वच मान्य करत नाहीत तर सर्व धर्मांचा सत्याच्याच रूपात स्वीकार करतो. यात हिंदू संस्कृतीच्या व्याप्ती व स्विकृती दर्शविली. याही पुढे जाऊन स्वामीजी सांगतात. मला गर्व आहे की मी त्या देशात राहतो की ज्या देशाने अन्य ठिकाणी गांजलेल्या लोकांना शरण दिली आहे. मला या गोष्टीचा गर्व आहे की ज्या ज्यू लोकांचा छळ झाला त्यांना आम्ही केवळ आमच्या देशातच नव्हे तर हृदयात स्थान दिलं. रोमनांच्या हल्ल्यातून वाचलेल्यानी दक्षिण भारतात आपले  स्थान निर्माण केल. पारसी धर्माच्या लोकांचं या देशात स्वागत केलं आणि ते त्यांची आजतागायत मदत करत आहे. स्वामीजी म्हणतात अश्या धर्मात जन्मल्याचा गर्व आहे.  स्वामीजींनी भारत भूमी हि मानव आश्रय देणारी तर आहेच पण त्यांना आपलेसे करणारी असल्याचे जगाला दाखवून दिले.  स्वामीजी आपल्या भाषणात  भगवतगीतेतील श्लोक सांगतात की ज्याप्रमाणे नद्यांची उगमस्थाने वेगवेगळी असून  त्या  वेगवेगळ्या मार्गाने जाऊन सागरास मिळतात.  त्याचप्रमाणे मनुष्यही आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे पंथ निवडतो. हे पंथ भलेही वेगळे असो पण ते सर्व ईश्वरापर्यंत पोहोचवतात हा माझा विश्वास आहे. यातून सर्वधर्म समभाव हि शिकवण स्वामीजींनी जगाला दिली.
विठ्ठल वळसेपाटील
सणसवाडी-पुणे 8484066042

No comments:

Post a Comment