उड्डाणपुलाचे कामामुळे वाहतूक मार्गात बदल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

उड्डाणपुलाचे कामामुळे वाहतूक मार्गात बदल.

 उड्डाणपुलाचे कामामुळे वाहतूक मार्गात बदल.


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू असून जीपीओ चौकात उड्डाणपुलासाठी खड्डा करण्यात येणार असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्याची वाहतूक अन्य मार्गाने वळविली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. आज पासून 11 फेब्रुवारी पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय रोडने शासकीय पोस्ट ऑफिस पासून जीपीओ चौकाकडे जाणार्‍या सर्व प्रकारचे वाहनास बंदी करण्यात आली आहे या मार्गावरील सर्व वाहने शासकीय पोस्ट ऑफिस येथून अशोक हॉटेल मार्गे नगर पुणे रोड मार्गाकडे वळविण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जीपओ चौका मार्गे पुणेकडे जाणारी वाहतूक पराग बिल्डींग, चांदणी चौक मार्गे नगर पुणे रोड चा मार्ग वळविण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment