वाहतूक शाखा व युनायटेड हॉस्पिटलचा उपक्रम.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 25, 2021

वाहतूक शाखा व युनायटेड हॉस्पिटलचा उपक्रम..

 वाहतूक शाखा व युनायटेड हॉस्पिटलचा उपक्रम..

पोलीस, नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप...

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः शहरातील विविध रस्त्यावर अद्यापही काही लोक मास्कचा वापर करत नसल्याचे समोर येत आहे. मात्र, वाहतुक शाखा व युनाटेड हॉस्पिटलच्या वतीने आज पत्रकार चौक या ठिकाणी रस्त्यावरुन जाणार्या व मास्क न लावणार्या दुचाकी चारचाकी चालकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप युनायटेड हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले. 18 जानेवारी पासून शहरातील वाहतूक शाखा रस्ता सुरक्षा  अभियान राबवित येत आहे. रस्त्यावर उभे राहून वाहतुक पोलिस अनेक संकटांना तोड देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज युनायटेड सिटी हॉस्पिटलच्या वतीने वाहतुक कार्यालयाला व नागरिकांना  मास्क व सॅनिटायझर भेट देण्यात आले आहे.पोलिस जनतेचा मित्र ही भावना सर्व जनमानसात रुजवणार असा संकल्प सर्वांनी केला  कोरोना महामारीने मध्यतरी सर्वत्र थैमान घातले होते, मात्र आता त्याची व्याप्ती कमी कमी होत चालली आहे. मात्र, तुर्त तरी नागरीकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावे असे डॉक्टर सांगत आहेत. मात्र, वाहुतुक पोलिस आपली कामगिरी बजावत असताना त्यांचे देखील या गोष्टींकडे दुर्लक्ष होवू नये व त्यांनी देखील आरोग्याची काळजी घ्यावी या दृष्टीने युनायटेड सिटी हॉस्पिटलच्या वतीने मास्क व सॅनिटायझर वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here