आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये किडनी वाचवा उपक्रमांतर्गत मोफत ओपीडी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 22, 2021

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये किडनी वाचवा उपक्रमांतर्गत मोफत ओपीडी

 आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये किडनी वाचवा उपक्रमांतर्गत मोफत ओपीडी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये किडनी विकारावर अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध आहे. या सेवेचा जास्तीत जास्त रूग्णांना फायदा व्हावा यासाठी हॉस्पिटलमध्ये दि.26जानेवारी ते 28 मार्च या कालावधीत किडनी वाचवा उपक्रमांतर्गत मोफत ओपीडी सेवा उपलब्ध असणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत किडनी विकार तज्ज्ञ डॉ.गोविंद कासट रूग्ण तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
   डॉ.कासट हे यांनी एम.डी. व डी.एम.केलेले असून अनुभवी नेफ्रोलॉजी व ट्रान्सप्लांट फिजिशियन आहेत. गुजरात विद्यापीठाकडून त्यांना गोल्ड मेडल मिळालेले आहे. पुण्यातील ससून हॉस्पिटल व बी.जे.मेडिकल कॉलेज मध्ये त्यांनी अध्यापनाचे कामही केले आहे. जॉन हॉपकिन्स फेलो इन डायबेटॉलॉजी त्यांना मिळाली आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे त्यांना वा.एन.पी.अवार्डही मिळाला आहे. डॉ.कासट यांना सातशेहून अधिक किडनी प्रत्यारोपणाचा अनुभव आहे.
   डॉ.कासट आपल्या अनुभवातून रूग्णांना मार्गदर्शन करणार आहेत. उच्चरक्तदाब, मधुमेह व हृदयरोग असणार्या रूग्णांनी वर्षातून एकदा किडनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यास भविष्यातील किडनी विकार टळण्यास मदत होते.आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत 20 बेडसचा डायलेसिस विभाग कार्यरत आहे. याशिवाय हिपॅटायटिस सी व बी संक्रमित रूग्णांसाठी 8 बेडचे डायलेसिस युनिट आहे.

No comments:

Post a Comment