हायवे वाहतुक पोलीस देणार गावोगावी वाहतुकीचे धडे ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 22, 2021

हायवे वाहतुक पोलीस देणार गावोगावी वाहतुकीचे धडे !

 हायवे वाहतुक पोलीस देणार गावोगावी वाहतुकीचे धडे !

सपोनि शशिकांत गिरी राबवणार अभियान व मार्गदर्शन फेरी.

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः हायवे वाहतूक पोलीस मदत केंद्र केडगाव तर्फे 32 वा राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचे अनुषंगाने नगर तालुक्यासह जिल्ह्यामध्ये नागरिकांना वाहतुकीचे नियम तसेच महामार्गावर होणार्‍या अपघातांची कारणे याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येत आहे , या अभियानाची सुरुवात नगर तालुक्यातील अकोळनेर येथुन करण्यात आली.येथील इंडियन ऑईल डेपो येथे केडगाव पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी तसेच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन ऑइल डेपोतील वाहनचालकांना वाहतुकीचे नियम त्याचबरोबर अपघाताची कारणे वेगमर्यादा याबाबत वाहनचालकांना मार्गदर्शन करून प्रबोधन करण्यात आले.
यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी म्हणाले की प्रत्येक वाहन चालकाने वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालवल्यास अपघातांवर नक्कीच नियंत्रण बसेल .त्याचबरोबर शासनाने महामार्गावर दिलेल्या सूचनाफलकाकडे दुर्लक्ष न करता त्याबाबत योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे, त्याचबरोबर अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करणे  हे आपले कर्तव्य असून माणुसकीच्या नात्याने ते कर्तव्य प्रत्येकाने पार पाडायला हवे असे मत व्यक्त केले.सदरचे अभियान
   अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य श्री भूषणकुमार उपाध्याय,पोलीस अधीक्षक महामार्ग पुणे विभागाचे संजय जाधव , ,पोलीस उपअधीक्षक  प्रीतम यावलकर  ,पोलीस निरीक्षक, नंदिनी चानपूरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली राबण्यात येत असल्याची माहिती गिरी यांनी दिली
यावेळी प्रमुख पाहुणे व ऊद्घाटक म्हणुन वरिष्ठ डिपो प्रबंधक, श्री आर निलकंठन ,मुख्य प्रबंधक परियोजना शशांक जाधव ,श्री प्रसाद गावडे यांच्यासह डेपोतील वाहनचालक,केडगाव मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
   रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक पोलिसांकडून सुमारे तीस दिवस हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये हायवे लगत असणार्‍या गावांनमध्ये वाहतुकीचे नियम व सूचना दर्शक फलक असलेले वाहन गावांमध्ये फेरी काढुन तसेच रहदारीच्या ठिकाणी नागरिकांना रस्ता सुरक्षा अंतर्गत माहिती सांगून अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस प्रबोधन करणार आहेत.

No comments:

Post a Comment