प्रभुरामाच्या मंदिर निर्मितीसाठी हिंदसेवा मंडळाचा खारीचा वाटा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 20, 2021

प्रभुरामाच्या मंदिर निर्मितीसाठी हिंदसेवा मंडळाचा खारीचा वाटा

 प्रभुरामाच्या मंदिर निर्मितीसाठी हिंदसेवा मंडळाचा खारीचा वाटा


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः राष्ट्र एकात्मतेचे प्रतिक असलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराशी देशातील कोट्यवधी जनतेच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. करोडो देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभुरामाच्या मंदिराचे काम सुरु झाले आहे. हिंदसेवा मंडळाने खारीचा वाटा उचलत मंदिर निर्माण कार्यात छोटासा हातभार लावला आहे, असे प्रतिपादन जेष्ठनेते ब्रिजलाला सारडा यांनी केले.
   अयोध्या येथील प्रभुरामाच्या भव्य मंदिर उभारणीच्या कामासाठी नगरच्या हिंदसेवा मंडळाच्या वतीने 51 हजार रुपयाचा धनादेश श्रीराम मंदिर न्यास समितीचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा, माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाला सारडा, सह सचिव अशोक उपाध्ये, सुमतिलाल कोठारी, प्रा.मकरंद खेर, डॉ.पारस कोठारी, अनिल देशपांडे, मधुसूदन सारडा, रणजीत श्रीगोड, सचिन मुळे आदी उपस्थित होते. यावेळी मंडळाने दिलेल्या मदतीबद्दल गोविंदगिरी महाराजांनी समाधान व्यक्त केले.
   यावेळी प्रा. शिरीष मोडक म्हणाले, राष्ट्र भावनेने काम करणारी हिंदसेवा मंडळ ही शैक्षनिक संस्था राष्ट्र उभारणीच्या कार्यात हातभार लावत आहे. देशात राज्यात आलेल्या प्रत्तेक आपत्तीत मदत करत आहे.  अयोध्येतील प्रभूरामाचे मंदिर आता प्रत्यक्षात येणार आहे. त्यामुळे या ईश्वरी कार्यात  मंडळ सहभागी होत मंदिर उभारणीस मदत केली आहे. सचिव संजय जोशी म्हणाले, हिंदसेवा मंडळाच्या माध्यमातून ज्ञान दानाचे कार्य करतांना विविध सामाजिक कार्यातही संस्थेचा उत्फूर्त सहभाग कायम असतो. प्रभुरामचे मंदिर होणे ही सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

No comments:

Post a Comment